Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: तापीच्या डोहात मित्रांदेखत गेला; पोहताना फिट आल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

Young Man Drowned In Tapi River: तापीच्या डोहात मित्रांदेखत गेला; पोहताना फिट आल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नदीपात्रात पोहत असताना अचानक फिट आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धामणगावजवळील (Tapi River) तापी नदीपात्रात घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात (Jalgaon News) आली आहे. रविंद्र आत्माराम कोळी (वय ३०, रा. जैनाबाद, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील जैनाबाद- कांचननगर परिसरातील रविंद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. सोमवारी (२९मे) रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. तापी नदीत पोहता येत असल्याने तो एकटाच पाण्यात पोहण्यासाठी उतरला. तर, त्याचे दोघे मित्र काही अंतरावर बसलेले होते.

ग्रामस्‍थांनी बुडताना पाहिले

पाण्यात पोहत असताना अचानक रविंद्रला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. या वेळी नदीपात्राच्या दुसऱ्या तिरावर असलेल्या ग्रामस्थांना तरुण बुडत असल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड करत बोंब ठोकली. त्यामुळे समोरच बसलेल्या त्याच्या मित्रांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने पाण्यात रविंद्रच्या दिशेने उड्या घेत त्याला बाहेर काढले व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्याच्या पोटातून पाणी काढण्याचा आणि कृत्रीम श्‍वासोश्‍वास देण्याचाही प्रयत्न झाला. रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. रविंद्रच्या मागे आई आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT