Rain Alert Jalgaon Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जिल्ह्यात पुढील तीन दिवस ‘येलो अलर्ट’

जिल्ह्यात पुढील तीन दिवस ‘येलो अलर्ट’

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात वरुणराजा दमदार बरसत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्हाभरात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नद्या, नाले वाहू लागले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे सात मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्याला हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. आगामी तीन दिवसांत कोठे ना कोठे विजांचा कडकडाटासह (Rain) पाऊस पडण्याचा इशारा आहे. (Jalgaon News Yellow Alert)

आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तवलेली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत केव्हाही ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याकडून (Jalgaon) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. नद्यांवरील लहान व मोठ्या प्रकल्पांचा धरणसाठा १०० टक्के पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठ्या धरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. हा परतीचा पाऊस ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने पावसादरम्यान विजा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT