Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : तारेवरचे कपडे काढताना अनर्थ घडला; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Jalgaon News : कपडे वाळत टाकताना अनेकदा दुर्दैवी घटना घडत असतात अशीच घटना जळगावात घडली असून कपडे सुकण्यासाठी बांधलेल्या तारात विद्युत प्रवाह उतरल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : सकाळी धुतलेले कपडे वाळल्याने दुपारच्या वेळी ते काढण्यासाठी महिला गेली. मात्र कपडे टाकलेल्या तारात विद्युत प्रवाह उतरला असल्याने त्याचा जोरदार झटका महिलेला बसला. यात महिलेचा जातीचं मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव शहरातील महाबळ कॉलनीत वास्तव्यास असलेल्या भावना राकेश जाधव (वय ७१) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी धुतलेले कपडे घराच्या बाजूला बांधलेल्या तारांवर वाळण्यासाठी टाकले होते. दरम्यान दुपारी कपडे सुकल्यामुळे भावना जाधव या कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र वाळत घातलेले कपडे काढताना तारांत वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का लागून ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू 

सदर घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.

पाण्याची मोटार लावताना विजेचा धक्का 

अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथे पाण्याच्या मोटारीला पिन लावत असताना विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. लताबाई भाऊसाहेब पाटील (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. लताबाई पाटील या घराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या मोटारीला पिन लावण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT