Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : भीषण दुर्घटना..गळ्यातील स्कार्फने महिलेचा गेला जीव; कंपनीत काम करताना घडली घटना

Jalgaon News : मशिनजवळ जोरदार आवाज झाला. काय झाले म्हणून गोविंद हा वर धावत गेला. यावेळी समोरचे दृश्‍य पाहून तो जमिनीवर कोसळला.

Rajesh Sonwane

जळगाव : घरची परिस्थिती हलाकीची असल्याने पती- पत्नी दोघेजण सोबत जळगाव एमआयडीसी (MIDC) परिसरातील व्ही-सेक्टरमध्ये असलेल्या दालमिलमध्ये पती-पत्नी सोबत काम करत होते. मशीनवर सोबत काम करत (Jalgaon) असताना महिलेच्या गळ्यात असलेल्या स्कार्फने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. मशीन चालू होताच गळ्यातील स्कार्फ मशिनच्या पट्ट्यात अडकून महिलेचे शीर धडावेगळे झाले. सरस्वती गोविंद ठाकरे (वय ३५) असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. (Live Marathi News)

जळगाव एमआयडिसीतील मुकेश ॲग्रो इंडस्ट्रीजच्या आवारातच सरस्वती ठाकरे व पती गोविंद नानू ठाकरे हे वास्तव्यास होते. मागील दोन वर्षांपासून पती- पत्नी सोबतच दालमिलमध्ये कामाला होते. दरम्यान १२ मार्चला नेहमीप्रमाणे (Accident) कंपनीत काम करत असताना गोविंद याने पत्नी सरस्वतीला वर जाऊन दालमील यंत्रासाठी आवश्यक आद्रतेनुसार थोडे पाणी व पावडर टाकण्यास सांगितले. यानंतर मशिन सुरु केले. सरस्वती मशिनमध्ये डाळ टाकत असताना गळ्यात बांधलेला स्कार्फ मशिनच्या पट्ट्यात ओढला गेला. गळ्यातील स्कार्फसह सरस्वती ओढली जाऊन तिचे शीर धडावेगळे झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दृश्य पाहून पती कोसळला 

मशिनजवळ जोरदार आवाज झाला. काय झाले म्हणून गोविंद हा वर धावत गेला. यावेळी समोरचे दृश्‍य पाहून तो जमिनीवर कोसळला. आपल्यासोबत जेवण करून काम करणारी पत्नीचे धड एकीकडे तर, मुंडके दुसऱ्या बाजूला पडलेले पाहून गोविंदला काय करावे सुचत नव्हते. यानंतर दालमिलमधील इतर कामगारांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT