death 
महाराष्ट्र

पत्नी मुलांकडे बाहेरगावी; इकडे बंद घरात पतीचा मृत्‍यू

पत्नी मुलांकडे बाहेरगावी; इकडे बंद घरात पतीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील शिव कॉलनी परिसरातील बंद घरात प्रौढाचा मृतदेह आढळून आला असून त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-news-Wife-to-children-out-of-town-Her-husband-died-in-a-closed-house)

जळगाव (Jalgaon) शहरातील शिवकॉलनी परिसरात प्रभाकर डिगंबर लांडे (वय ५७) पत्नी शोभा यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांची पंकज आणि राहुल अशी दोन्ही मुले नोकरी निमित्ताने बाहेरगावी असल्यामुळे प्रभाकर लांडे व पत्नी शोभा लांडे असे दोघेच घरी राहत होते. दरम्यान त्यांचा मुलगा राहुल मुंबईत नोकरीला असल्यामुळे त्याच्याकडे राहण्यासाठी शोभा लांडे या काही दिवसांपूर्वी गेल्या होत्या. म्हणून प्रभाकर लांडे हे घरात एकटेच होते. रविवार (५ डिसेंबर) दुपारी दोनला त्यांचे पत्नी शोभा यांच्याशी बोलणे झाले होते. त्यानंतर मात्र दोघांत संपर्क झाला नाही. खुप प्रयत्न करुनही शोभा यांचा फोन कोणी उचलत नव्हते आणि नंतर फोन बंद झाल्याने मंगळवार (७ डिसेंबर) त्यांनी सायंकाळी शेजारी भोळे कुटूंबाना फोन केला. तसेच घरी जावुन प्रभाकर लांडे यांची माहिती घेण्यास सांगितले.

शेजाऱ्यांना आढळला मृतदेह

या अनुषंगाने भोळे हे गेले असतांना घरातील दरवाजा आतून बंद असल्याच्या दिसून आल्यानंतर एकाने बाजूच्या इमारतीवरून उडी घेत आत प्रवेश केला. तर प्रभाकर लांडे मयत स्थीतीत आढळून आले. शेजाऱ्यांनी कुटूंबीयांना व पोलिसांना कळवल्यावर मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलवण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कळसकर यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक सागर देवरे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी शोभा, राहुल आणि पंकज हे दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT