Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : २५ हजार रुपये घेताना ग्रामविकास अधिकारी ताब्यात; बिल मंजुरीसाठी घेतली लाच

Jalgaon News : तक्रारदाराने खर्दे बुद्रुक गावात दोन लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यांना दोन लाख ६४ हजार रुपयांचे धनादेश मिळाले. ग्रामविकास अधिकाऱ्याने बिलांच्या प्रक्रियेसाठी लाचेची मागणी

Rajesh Sonwane

जळगाव : गावात केलेल्या विकास कामांचे बिल काढायचे होते. या बिलांच्या प्रक्रियेसाठी मंजूर बिलाच्या दहा टक्के रक्कम मागणी ग्रामविकास अधिकाऱ्याने केली. साधारण २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राह्मणे (वय ३७) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या लाचखोराचे नाव आहे. तक्रारदाराने खर्दे बुद्रुक गावात दोन लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते. ज्यासाठी त्यांना दोन लाख ६४ हजार रुपयांचे धनादेश मिळाले. मात्र, ग्रामविकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी दहा टक्के म्हणजे २७ हजार रुपये लाचेची मागणी केली. 

दरम्यान तडजोडीनंतर २५ हजार रुपयांची रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्चला दुपारी सापळा रचण्यात आला. संशयित ब्राह्मणे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना पथकाने रंगेहाथ पकडले.

धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल 
लाच घेताना ग्रामविकास अधिकारी नितीन ब्राह्मणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर महाजन व अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatak: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या इतिहास येणार समोर; 'शतक' चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

5 Matar Recipe: नवऱ्यासाठी मटारपासून बनवा खास चविष्ट 5 पदार्थ, प्रेमाने करेल कौतुक

Katachi Amti Recipe: मकरसंक्रांतीला पुरणपोळीसोबत बनवा झणझणीत कटाची आमटी; लगेच नोट करा रेसिपी

Relationship Trends: रिलेशनशीपचा नवा ट्रेंड! डेटवर जा, लग्न करा आणि २५ लाख मिळवा

Kartik And mystery Girl: कार्तिक आर्यन आणि मिस्ट्री गर्ल गोव्यात एकाच हॉटेलमध्ये; त्या फोटोमुळे नेटकऱ्यांना वेगळाचं डाऊट

SCROLL FOR NEXT