Uttarkashi Cloudburst Saam tv
महाराष्ट्र

Uttarkashi Cloudburst : उत्तराखंड दुर्घनेत पाचोरा येथील जवान बेपत्ता; जळगावच्या १३ भाविकांशीही संपर्क होईना, तीनजण सुखरूप

Jalgaon News : उत्तरकाशीत अचानक ढग फुटले. ढगफुटीमुले एकच हाहाकार उडाला असून अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली असून यात अनेकजण बेपत्ता झाले आहेत. याठिकाणी जळगाव जिल्ह्यातील भाविक देखील गेले होते

संजय महाजन

जळगाव : उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस यानंतर झालेल्या भूसख्खलन झाल्याने हाहाकार उडाला आहे. यात अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाळले गेले असून या घटनेत अनेकजण येथे बेपत्ता झाले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एक जवान बेपत्ता आहे. तसेच जिल्ह्यातील १३ भाविकांशी देखील अद्याप संपर्क झालेला नसून तीन जण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. 

उत्तराखंडच्या उत्तरकाशी मधील धराली गावात ढगफुटी झाली. यानंतर प्रचंड हाहाकार उडाला आहे. भूसख्खलन होऊन याठिकाणी शेकडो घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले आहेत. यामुळे अनेकजण बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप शोध सुरु आहे. दरम्यान काशीला दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातून देखील अनेक भाविक गेले आहेत. या घटनेनंतर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांशी संपर्क होऊ शकत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.   

पाचोरा येथील जवान बेपत्ता 

दरम्यान उत्तराखंड दुर्घटनेत जळगाव शहरातील तीन भाविक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पाचोरा येथील एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा येथील जवान सोपान अहिरे हे उत्तराखंड येथील हर्षल गावात कर्तव्यावर असताना बेपत्ता झाले आहेत. त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे परिवार चिंतेत सापडला आहे. तर जळगाव शहरातील आयोध्यानगर येथील मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा, रुपेश मेहरा हे सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

१३ जणांशी संपर्क होईना 

त्याचप्रमाणे धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तेरा तरुणांचा देखील संपर्क होत नसल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, सगदीक नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील (सुरत), राकेश माळी, भूषण माळी व पवन यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT