Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Jalgaon News : विजेचा जोरदार धक्का लागला. यामुळे तो फेकला गेल्याने जखमी झाला. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजूर आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले

Rajesh Sonwane

जळगाव : गावात नवीन घराचे बांधकाम सुरु केले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन घरात जाण्याचे स्वप्न तरुण शेतकऱ्याचे होते. या बांधकामाच्या ठिकाणी गेला असता विजेचा जोरदार झटका बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील दापोरा येथे घडली आहे. या घटनेमुळे तरुणाचे नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. 

जळगाव तालुक्यातील दापोरा येथील मयूर किशोर काळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदरची घटना २५ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घडली आहे. मयूर काळे हा तरुण पत्नी, आई- वडील आणि भाऊ अशा कुटुंबाचा उदनिर्वाह शेती करुन चालवत होता. शेतीच्या उत्पन्नातून तसेच मजुरी करून कमावलेले पैसे जमा करून गावात चांगले घर बांधण्याचे नियोजन केले होते. नव्या घराचे स्वप्न रंगवत असतानाच गुरुवारी काळाने त्याच्यावर झडप घातली. 

बांधकामाच्या ठिकाणी लागला जोरदार धक्का 

सकाळी नेहमीप्रमाणे मयूर बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. घराचे बांधकाम सुरू असताना वीज जोडणीत करत असताना त्याला विजेचा धक्का लागला. यामुळे तो फेकला गेल्याने जखमी झाला. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजूर आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

मयूर याच्या मृत्यू झाल्याची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर गावातील तरुण, त्याचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी जिल्‍हा रुग्णालयात गर्दी केली होती. काळे कुटुंबीयांचा कर्ता पुरुष निघून गेल्याने वडील आणि भावाने प्रचंड आक्रोश केला. तर त्याची एकुलत्या एक मुलीचे पित्याचे छत्र हरपले असून, अपघातामुळे दापोरा ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT