Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: बचावासाठी आडोशाला धावले तरीही मृत्‍यूने गाठले; वादळी वाऱ्याने कंटेनर उलटून दोन ठार, एक जखमी

बचावासाठी आळोसा तरीही मृत्‍यूने गाठले; वादळी वाऱ्याने कंटेनर उलटून दोन ठार, एक जखमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अचानक वादळीवाऱ्यामुळे उभा कंटेनर उलटल्याची घटना चिंचोली शिवारात घडली. याच कंटेनरच्या आडोशाला जीव वाचविण्यासाठी उभे असलेले दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जळगाव (Jalgaon) तालुक्यातील चिंचोली गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Jalgaon Medical Collage) बांधकाम ठिकाणी गुरूवारी (ता.२७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मजुर भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि अभियंता चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा.चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मृतांचे नावे आहेत. (Live Marathi News)

जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. अनेक दिवस बंद असलेल्या या बांधकामावर गेल्या जानेवारीपासून कामाला सुरवात झाली आहे. या ठिकाणी कंपनी अंतर्गत काही बिहार राज्यातील मजूर दोन महिन्यांपासून कामावर आहेत. गुरुवारी (ता. २७) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत मजुरांनी सुरवातीला पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. परंतु वादळाचा वेगापुढे पत्र्याचे शेड तग धरू शकले नाही. शेड उडून गेल्यावर मजूर मैदानात उभ्या कंटेनरच्या दिशेने जीव वाचविण्यासाठी धावले.

बचावासाठी आडोसा पण..

कंटेनरच्या बाजूला मजुरांनी आडोसा घेतला असतानाच वादळात उभे कंटेनर उलटले. यात भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा.चाळीसगाव ह.मु. पुणे) हे दोघे दाबले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा मजूर जखमी झाला. जखमीला तातडीने जळगावला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

क्रेन बोलावून काढले मृतदेह

कंटेनर उलटल्याची बातमी मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांना सुरवातीला अपघाताची शंका आली. मात्र, विस्तृत माहिती कळताच पोलिस पथकाने चिंचोलीच्या दिशेने धाव घेतली. कंटेनर खाली गाडले गेलेल्या दोघा मजुरांचा क्रेनच्या मदतीने कंटेनर उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT