Maval News: पोहण्याचा मोह बेतला जीवावर; तरूणाचा पाण्यात बुडून मृत्‍यू

पोहण्याचा मोह बेतला जीवावर; तरूणाचा पाण्यात बुडून मृत्‍यू
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : उन्हाचा तडाखा वाढल्याने इंद्रायणी नदीच्या तिरावर बोडकेवाडी कोल्हापूर बंधाऱ्यावर काही मित्र पोहण्यासाठी गेले. मात्र पोहण्याचा हा मोह जिवावर बेतला (Maval) असून यात तरुणाचा पाण्यात बुड़ुन दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. अक्षय वाघमारे असं तरुणाचं नाव आहे. (Latest Marathi News)

Maval News
Akola Accident: दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; २४ वर्षीय तरुणीचा दुर्देवी अंत

इंद्रायणी नदीवर बोडकेवाडी येथे असलेल्‍या कोल्‍हापूर बंधाऱ्यावर अक्षय वाघमारे व त्‍याच मित्र असे पाच मित्र सोबत पोहण्यासाठी बोडकेवाडी बंधाऱ्यावर गेला होता. पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी सोबतच्‍या मित्रांनी त्‍याला वाचविण्याचा प्रयत्‍न केला. परंतु, यश मिळाले नाही. यात अक्षय हा पाण्यात बुडाला.

Maval News
Amravati Crime: संतापजनक! अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार

रेस्‍क्‍यू टीमने काढले बाहेर

देहुरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीएमआरडी हिंजवड़ी आयटी हब, पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कु टीम.आणि वन्यजीव रक्षक मावळ यांना पाचारण केले. रेस्‍क्‍यू टीमने अक्षयला बेशुद्धावस्थेत बाहेर काढले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास देहुरोड पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com