Vijaykumar Gavit Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit: अभ्यास करा, मगच बोला; आदिवासी मंत्री गावितांचे अजित पवारांना प्रत्‍युत्‍तर

अभ्यास करा, मगच बोला; आदिवासी मंत्री गावितांचे अजित पवारांना प्रत्‍युत्‍तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : नाशिक येथीक अपघातातील मृतांना सरकारने दिलेल्‍या मदतीबाबत अजित पवार यांनी टीका केली आहे. याबाबत सांगणारे कमी दिली असे सांगतात. मात्र स्वत: असतांना किती मदत दिली आहे. याचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे; असे प्रत्युत्तर (Ajit Pawar) अजित पवार यांच्या टीकेवर आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत (Vijaykumar Gavit) दिले आहे. (jalgaon Vijaykumar Gavit News)

नाशिक (Nashik) येथील अपघातातील मयतांना शिंदे सरकारकडून तातडीने मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत तोकडी तसेच तुटपूंजी असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. या टीकेवर शिंदे सरकारमधील भाजपचे आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत हे आज (Jalgaon) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी जळगावात आयोजित कृषी महोत्सवाला भेट दिली. या भेटीनंतर विजयकुमार गावीत यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.

धनुष्यबाणावर प्रतिक्रीया

धनुष्यबाणाची लढाई सुरु आहे. शिंदे यांनी भापजच्या फायद्यासाठी निवडणुक आयोगाला पत्र दिले आहे; अशी टीका शिवसेनेकडून केली जात आहे. यावर आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे चालंल आहे, ते कायद्यानुसार व नियमानुसार होणार असल्याच मंत्री विजयकुमार गावीत यांनी म्हटले आहे. शंभर दिवस शिंदे गट व भाजप युतीतील सरकारला पूर्ण झाली आहे. तरीही सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. परंतु, शंभर दिवसात ठरल्याप्रमाणे सरकारमधील प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या खात्याची जबाबदारी पार पाडली, असल्याची आदिवासी मंत्री गावीत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT