शहादा (नंदुरबार) : शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन परतीच्या प्रवासात बसमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने आश्रम शाळेच्या (School) अधीक्षक महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला अटक करून (Nandurbar News) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासणीत सहलीदरम्यान त्याने विद्यार्थ्यांशीही विनयभंग केल्याचे आढळले असून, पोस्को अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज (Shahada) शहादा पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत सुरु होते. राजेंद्र जगन्नाथ मुसळे असे त्याचे नाव आहे. (Nandurbar Shahada News)
पिडित अधीक्षिका यांनी याबाबत प्रकल्प कार्यालय (Nandurbar) नंदुरबार येथील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज केला. यानंतर शहादा पोलिस (Police) ठाण्यामध्ये मुसळे याच्याविरुद्द गुन्हा दाखल झाला. तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल वेरूळ (ता. दौलताबाद) येथे नेण्यात आली. शैक्षणिक सहलीत इयत्ता दहावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, अधीक्षिका असे एकूण ३६० जण एसटी महामंडळाच्या सात बसेसने सहलीसाठी गेले होते.
बसमध्येच विनयभंग
सहली दरम्यान आश्रम शाळेतील एक अधीक्षिका महिला व एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे हे एकाच बसमधून प्रवास करीत होते. सहल आटोपून परतीच्या प्रवासात मुसळे याने अधीक्षिका महिलेशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.