Milk Saam tv
महाराष्ट्र

सातपुड्यात विषारी दूधनिर्मिती; साहित्यासह अडीच हजार लिटर दूध जप्त

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने सातपुडा पर्वत पायथ्याशी बिडगाव (ता. चोपडा) येथे रिफाइंड तेलापासून दूध तयार करणाऱ्या टोळीतील तीन संशयितांना अटक केली. मात्र, त्यांचा म्होरक्या पळून जाण्यात यशस्वी ठरला. या टोळीकडून तब्बल ११ लाख १८ हजार २३५ रुपयांचा मुद्देमालासह बनावट दूध जप्त करण्यात आले. (jalgaon news Toxic milk production in Satpuda aria)

नाशिक (Nashik) परिक्षेत्राचे विशेष पोलिस (Police) उपमहानिरिक्षक डॉ. बी. जे. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकातील वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम जिल्‍हा गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराने रसायनापासून दूध निर्माण करणाऱ्या कारखान्याची माहिती दिली. माहितीची खात्री करण्यासाठी पथकातील सचिन जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, प्रमोद मंडली. मनोज दुसाने, सुनील दामोदरे, संजय हिरवरकर, कुणाल मराठे, सुरेश टोंगरे, बशीर गुलाब तडवी यांच्या पथकासह अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन अशांनी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले.

रात्री रचला सापडा

बिडगाव (ता.चोपडा) येथील (Jalgoan News) कुंड्यापाणी येथे संभाजी पाटील यांच्या शेतात घातक रसायनांपासून दूध तयार करण्याचा कारखाना चालवला जात असल्याची खात्री झाल्यावर पथकाने मध्यरात्री चहूबाजूने सापळा रचत छापा टाकला. यात झोपडीच्या आडोशाला दोन महिंद्र पिक-अप आढळून आल्या. तेथे तीन व्यक्ती बल्बच्या प्रकाशात दुधाच्या कॅनमध्ये मिक्सरच्या साहाय्याने मिश्रण टाकत असताना आढळून आले. पथकाने छापा टाकून भिकन अशोक साळुंखे (वय २५, रा. चिंचोली, यावल), हेमंत रतिलाल महाजन (४२, रा. धानोरा, ता. चोपडा), सारा बुटा भरवाड (४०, मूळ रा. लिंबडी, जि. सुननगर, गुजरात. ह. मु. बिडगाव कुड्यापाणी) अशा तिघांसह विनानंबर पिक-अप व्हॅनजवळ उभा हर्षल पंढरीनाथ पाटील (१८, रा. चिंचोली, ता. यावल) या वाहनचालकासह चौघांना ताब्यात घेतले. अन्न व सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्यासमक्ष ताब्यात घेतलेल्या चौघांची विचारपूस केली असता त्यांनी बनावट दूध तयार करण्याचा अड्डा लक्ष्मण देवा भरवाड (रा. पळासनेर, ता. शिरपूर) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. बनावट रसायनयुक्त दूध तयार करण्यासाठी घटनास्थळावर ८५ किलो पामतेल, २० किलो दूध भुकटी मिळून आली.

घटनास्थळावर आढळून आलेला मुद्देमाल

- ८५ लिटर पाम ऑइल (प्रत्येकी १५ लिटरचे डबे)

- २० किलो अमूल व्हॅली दूध पावडर

- ऑल आउट कंपनीचे मिक्सर ग्राइंडर (दोन नग)

- मिश्रण कालविण्याचा प्लॅस्टिक मग

- ४० लिटर कॅनमध्ये तयार होणारे दूध

- ओकाया कंपनीच्या इन्व्हर्टर बॅटऱ्या (दोन नग)

- रिफाइंड पाम ऑइलचे ११ पत्री रिकामे डबे

- महिंद्र पिक-अप (एमएच १८- बीजे ६५४४)

- १८ कॅन (दुधाने भरलेल्या)

- रिकाम्या चार कॅन

-विनानंबर महिंद्र पिक-अप व्हॅन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT