Jalgaon News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : अंगणात खेळतांना चिमुकलीला मृत्‍यूने गाठले; विजप्रवाह असलेल्‍या खांब्याला स्पर्श

अंगणात खेळतांना चिमुकलीला मृत्‍यूने गाठले; विजप्रवाह असलेल्‍या खांब्याला स्पर्श

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नशिराबाद शेत शिवारात सालदारकी करत असलेल्‍या कुटूंबातील चिमुरडी भावंड झोपडी जवळ खेळत असतांना तीन वर्षीय बालिकेचा विद्युत खांब्याला स्पर्श (Electric Shock) होवुन जागीच मृत्यु झाला. बावरी रुमला पावरा असे मृत झालेल्‍या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात (Jalgaon) अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली. (Breaking Marathi News)

नशिराबाद (ता. जळगाव) गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण सालदारकी करतो. तो आई, वडील, पत्नी आणि तीन मुली अशा कुटूंबासह शेतातच झोपडी बांधून वास्‍तव्‍यास होता. त्यांच्या झोपडी शेजारून विद्यूत तारा गेलेल्या आहेत. एकामागून एक अशा (Farmer) तीन खोल्या असून रविवार (१६ जुलै) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रूमला पावरा यांची सर्वांत लहान मुलगी बावरी ही आपल्या दोन मोठ्या बहिणीसोबत झोपडीजवळ खेळत होत्या. त्यावेळी शेतातील लोखंडी विद्युत पेालमध्ये विजप्रवाह उतरला होता. चिमुरडी बावरी खेळता-खेळता या खांब्याजवळ आली अन्‌ तिचा स्पर्श होताच तिला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.

तिच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

SCROLL FOR NEXT