Corona 
महाराष्ट्र

दिवाळीत सांभाळा..अन्‍यथा डिसेंबरअखेर कोरोनाची तिसरी लाट

दिवाळीत सांभाळा..अन्‍यथा डिसेंबरअखेर कोरोनाची तिसरी लाट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. असेच चित्र राहिल्यास डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवाळी, पाडवा, भाऊबीजेनिमित्त प्रवास वाढेल. या सणासुदीमध्‍ये नागरीकांनी सांभाळावे. कारण यातून कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. (jalgaon-news-third-wave-of-Corona-at-the-end-of-December-month)

दोन दिवसांपूर्वीच एरंडोलला एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण झाली. ते कुटुंबीय मुंबई येथे बाधित नातेवाइकांच्या संपर्कात आल्याची ‘हिस्ट्री’ आहे. यामुळे नागरिकांना दिवाळीत नातेवाइकांकडे जाताना कोरोना संसर्गाचे नियम पाळूनच जावे लागेल. रशियात चौथी, पाचवी कोरोनाची लाट आली आहे. संपर्कातूनच तिसरी लाट येईल. ती लाट येऊ नये यासाठी सर्वांना कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. लस घेतली तरच कोरोना संसर्गापासून आपला बचाव होऊ शकेल. यामुळे पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देणे व लसच न घेतलेल्यांना पहिला डोस देणे हे एक आव्हान आरोग्य व जिल्हा यंत्रणेसमोर आहे.

तीव्रता कमी राहील

जिल्ह्यात तिसरी लाट आली तरी रुग्णांनी घाबरून न जाता कोरोनाची तपासणी करणे, गरज पडली तर रुग्णालयात लवकर दाखल होऊन उपचार सुरू केले तर कोरोनावर मात करता येईल. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची जादा गरज भासली होती. यामुळे जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आले आहेत. लांट सुरू झाले तर ते लागलीच सुरू केले जातील. तिसरी लाट येईपर्यंत सर्वच नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले असल्यास तिसऱ्या लाटेचा धोका नाही. ती लाट येऊनही नागरिकांना तिचा फारसा त्रास होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाची तिसरी लाट डिसेंबर, जानेवारीत येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण केले असेल तर तिसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी असेल. आपण ऑक्सिजन प्लांट ठिकठिकाणी उभारले असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असेल.

– डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT