Petrol Hike
Petrol Hike

बैलगाडीवरून दुचाकी मोर्चा; धुळ्यात राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून आंदोलन

बैलगाडीवरून दुचाकी मोर्चा; धुळ्यात राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून आंदोलन
Published on

धुळे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी ‘आब की बार महंगाई पर वार’ म्हणत बैलगाडीवरून दुचाकी मोर्चा काढत आंदोलन केले. (dhule-news-Two-wheeler-march-from-bullock-cart-Movement-by-Nationalist-Youth-Congress-in-Dhule)

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे या इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. धुळे शहरातील बारा फत्थर या ठिकाणाहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

बैलगाडीवर मोटारसायकल

पेट्रोल नसलेली दुचाकी आंदोलकांनी बैलगाडी वर ठेऊन हा मोर्चा काढला आहे. केंद्र सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेली इंधन दरवाढ थांबवावी व सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक देखील थांबवावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलकांनी केली आहे.

Petrol Hike
लखीमपूर दुर्घटनेतील शेतकऱ्यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन...

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

केंद्र सरकारच्या महागाईविरोधी धोरणा विरोधामध्ये मोर्चा काढल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने सामील झालेल्या सर्व आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com