Gold Silver Saam tv
महाराष्ट्र

सोने– चांदी दरवाढीचा असाही फायदा

सोने– चांदी दरवाढीचा असाही फायदा

संजय महाजन

जळगाव : सोने– चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. आता या भाववाढीचा फायदा म्‍हणून सोने चांदीचे दागिने खरेदीपेक्षा मोड करून पैशांची जमवाजमव केली जात आहे. (jalgaon news the advantage of gold silver price hike)

सराफ बाजारात गेल्‍या काही महिन्‍यांपासून अस्‍थीरता पाहण्यास मिळाली. सोने (Gold) व चांदीचे दर सातत्‍याने वाढत राहिले. लग्‍नसराई असल्‍याने खरेदी ही होतच राहिली. मात्र ज्यांनी कमी भावात सोने- चांदीचे दागिने (Gold Price) खरेदी केले होते. ते सध्याच्या भाव वाढीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

२०२० मध्‍ये उच्‍चांक

तीन वर्षांपूर्वी ४० हजारांच्या आत असलेले सोने व ५० हजारांच्या आत असलेल्या चांदीचे भाव कोरोना (Corona) संसर्ग वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढू लागले. त्यावेळी सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने सुवर्ण बाजार बंद असताना कमोडीटी मार्केटमध्ये सोने- चांदीची खरेदी वाढली. या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढली. सोने- चांदीच्या (Silver) भावाने २०२० मध्ये उच्चांकी गाठली. त्यानंतर हे भाव कमी होत गेले. मात्र गेल्या महिन्यापासून रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले आहेत.

सोने मोडचा भाव ५० हजार

खरेदी विक्रीच्या दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे. जीएसटीसह सोने ५२ हजार रुपये प्रति तोळ्याने विक्री होत असले; तरी मोडसाठी हा भाव ५० हजारापर्यंत मिळत आहे. चांदी मोड ६८ हजारांपर्यत चांदीच्या मोडचे भाव व नवीन खरेदीच्या भावातदेखील मोठी तफावत आहे. नवीन खरेदीचे जीएसटीसह दर ७० हजारांपर्यंत असले तरी मोडचे भाव ६८ हजारांपर्यंत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: फटाके वाजवायला गेला, पोरांनी घाबरवले, तोंडावरच आपटला, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

Navi Mumbai Accident : दिवाळीत 'ड्रंक अँड ड्राइव्ह, नवी मुंबईत मद्यपी चालकाने ३ जणांना उडवले, व्हिडीओ व्हायरल

Horoscope Today Marathi : नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा आजचे राशीभविष्य

Surya nakshatra gochar: सूर्याच्या नक्षत्र बदलाने 'या' राशींचं नशीब चमकणार; 'या' राशींच्या हाती येणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT