Nandurbar: ब्लड कॅम्पद्वारे उन्‍हाळ्यातही पर्याप्त रक्तसाठा

ब्लड कॅम्पद्वारे उन्‍हाळ्यातही पर्याप्त रक्तसाठा
Nandurbar
NandurbarSaam tv
Published On

नंदुरबार : जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज अडीचशे ते तीनशे बाह्यरुग्ण उपचार घेत असतात. त्याचप्रमाणे सिकलसेल, बालरोग, अनिमिया, डिलिव्हरी पेशंट तसेच अपघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे रोज वीस ते तीस बॅगा रक्तसाठा रुग्णांना पुरवला जातो. (nandurbar news Adequate blood supply even in summer through blood camp)

Nandurbar
शाईच्या स्वाक्षरीच्‍या प्रतीची आता गरज नाही; पारंपरिक कार्यपध्दतीत झाली सुधारणा

जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या (Hospital) रक्तपेढीमध्ये नेहमी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदात्यांना रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये येऊनच रक्तदान करण्याचे आवाहान केले जात आहे. मात्र काही प्रसारमाध्यमांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढीत फक्त दहा रक्त बॅगा शिल्लक असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याने (Nandurbar News) रक्तदानासारखा जिव्हाळ्याच्या विषयावर नागरिकांची दिशाभूल केल्याने प्रशासनाने खंडन केले आहे.

२५१ बॅगा उपलब्‍ध

गेल्या दोन दिवसात शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. जवळपास 251 विविध ब्लड ग्रुप च्या बॅगा उपलब्ध असल्याची माहिती रक्त संक्रमण अधिकारी रामा वाडेकर यांनी दिली आहे.

रक्तदानाचे आवाहन

जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढीत आजच्या स्थितीत मुबलक साठा उपलब्ध असला तरी पुढील एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासणार असल्याने अत्यावश्यक सेवा घेणाऱ्या रुग्णांना गैरसोय होऊ नये; यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहान डॉ. रमा वाडीकर यांनी केले आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढीत 24 तास रक्तदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com