जळगाव : राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना पाहण्यास मिळत आहे. यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात जिल्ह्यात आठवडाभरात सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Jalgaon Medical Collage) प्रयोगशाळेत रोज ७५ ते १०० स्वॅबची तपासणी होत आहे. (Jalgaon news six corona infected were found during the week)
जिल्ह्यात कोरोना (Corona) महामारीच्या तीन लाटा येऊन गेल्या. प्रत्येक लाट वेगवेगळे अनुभव देऊन गेली. यामुळे जिल्ह्यात लसीकरण, मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, सामाजिक अंतर ठेवणे या बाबी सर्वांनीच पाळायला सुरवात केली होती. मात्र, (Corona Third Wave) तिसरी लाट संपताच राज्य शासनाने कोरेाना महामारीचे सर्व निर्बंध शिथिल केले. यामुळे नागरिकांनी पुन्हा मास्क वापरणे बंद केले. लग्न (Marriage) समारंभापासून सर्वच ठिकाणी अधिकाधिक गर्दी होऊ लागली. दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर ठेवायला पाहिजे, ते पाळताना दिसत नाही. वारंवार हात धुण्याचे टाळतात. यामुळे जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत.
ताप, खोकल्याची लक्षण
जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील जळगाव शहरातील दोन, चोपडा येथील तीन व यावल येथील एकाचा समावेश आहे. त्यांना ताप, खोकला अशी लक्षण होती. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.