Accident Death Saam tv
महाराष्ट्र

बहिणीची भेट राहिली; गाव काही अंतरावर असताना भावावर काळाचा घाला

बहिणीची भेट राहिली; गाव काही अंतरावर असताना भावावर काळाचा घाला

साम टिव्ही ब्युरो

पातोंडा (जळगाव) : गडखांब गावाजवळ रविवारी दुपारी बसने दुचाकीला धडक दिल्याने गुगळवाळ (ता. मालेगाव) येथील तरुण प्रीतेश संजय निकम (वय २३) याचा जागीच मृत्यू (Death) झाला. (jalgaon news sister village is some distance away and accident death brother)

प्रीतेश हा पातोंडा येथे आपल्या बहिणीला भेटायला दुचाकीवर येत होता. गडखांब गावाजवळ इगतपुरी आगाराच्या चोपडा - नाशिक (Nashik) बसने (एमएच १४, बीटी ३६२९) पुढील बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला (एमएच ४१, सी ४१३५) जोरदार धडक (Accident) दिली. यात प्रीतेश निकम हा जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी जात पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी अमळनेर (Amalner) ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दोन बहिणींचा एकुलता भाऊ

प्रीतेश हा पातोंडा येथील भूषण एकनाथ बिरारी यांचा शालक असून, तो बहिणीला भेटायला येत असतानाच पातोंडा अवघे सहा किलोमीटर असतानाच काळाने घाला घातला. प्रीतेशच्या वडिलांचे मागील वर्षी अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने आई व दोन बहिणींचा तो एकुलता एक आधार होता. गतवर्षी नवापूरजवळ झालेल्या अपघातात प्रीतेशच्या कुटुंबातील सहा सदस्य मृत झाले होते. आता पूर्ण कुटुंबात तो एकटा पुरूष सदस्य होता.

चालक पोलिसात हजर

चोपडा - नाशिक बसचा चालक संदीप हरिश्चचंद्र धनावटे (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) अमळनेर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. पोलिस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, बसचालक समोरील बसला ओव्हरटेक करीत असताना अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी शेतात काम करणारे प्रत्यक्षदर्शी शेतकरी व शेतमजुरांमध्ये सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

SCROLL FOR NEXT