Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra GovernmentSaam Tv

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थक शिंदे गटात सामील

शिवसेनेचे आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) गोटातील आणखी एक शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याने आता शिवसेनेकडे (Uddhav Thackeray) फक्त 15 आमदार उरले आहेत. (Eknath Shinde Latest news)

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
महाविकास आघाडीला घटक पक्षाकडून आजही बसणार झटका?

शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा आता बंड केलं आहे. तब्बल 13 दिवसानंतर बांगर बंड करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बांगर यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या राजन साळवींना मतदान केलं होतं. आज मात्र, त्यांनी थेट शिंदे गटात उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Maharashtra Government
'भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल, तसा राज्यपालांना...'; शिवसेनेची बोचरी टीका

आज सकाळीच बांगर ताजमध्ये पोहोचले. शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि विधानसभे जाणाऱ्या शिंदे गटाच्या बसमध्येही बसले. त्यामुळे आता शिंदे गटाकडील शिवसेनेच्या आमदारांची संख्या 40 झाली आहे. विश्वासदर्शक ठरावाला अवघा अर्धा तास बाकी असतानाच बांगर यांनी गट बदलल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या तरी शिंदे गटाची बाजू भक्कम दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते : शरद पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल, पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com