Jalgaon News Shiv Sena
Jalgaon News Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: केंद्र सरकारविरोधात शिवसेना रस्‍त्‍यावर; काळ्याफिती लावून केला निषेध

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केंद्र सरकारने तपास यंत्रणा ईडीमार्फत (ED) लावून त्यांना अटकविण्यात आले आहे. याच्‍या निषेधार्थ शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी रस्त्यावर येत केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी काळ्याफिती लावून जाहीर निषेध केला. (Jalgaon Parola News Shiv Sena)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे निष्ठावंत नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी आळा निर्माण करावा. शिवसेना कशी खिळखिळ असा केंद्र सरकारचा असून त्यामुळे इडीमार्फत या कारवाया सुरू आहेत. मात्र (Jalgaon) शिवसैनिक या कारवाई विरोधात कदापी जुमानत नाही. संपूर्ण भारतात बाळासाहेबांचा आवाज व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अखंडितपणे महाराष्ट्राचे हित जोपासेल असेल. त्यामुळे असा कूटनीतीचा डाव करू नये. अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख माने यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

महामार्ग अडवित घोषणाबाजी

शिवसैनिकांनी यावेळी कजगाव रस्ता ते महामार्ग पोलीस स्टेशनपर्यंत सदर निषेध मोर्चा नेण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत महामार्ग अडविला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन दिले. या मोर्चात शिवसेना विधान क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, पारोळा तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे, उपप्रमुख भूषण भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT