Kisan Railway saam tv
महाराष्ट्र

धावली एक हजारावी किसान रेल्‍वे; आतापर्यंत झाली ३.४५ लाख टन शेतमालाची वाहतूक

संजय महाजन

जळगाव : सावदा (महाराष्ट्र) ते आदर्शनगर दिल्ली या दरम्‍यान एक हजारावी किसान रेल्‍वे धावली. ट्रेनला २३ डबे होते; ज्यात ४५३ टन केळीची वाहतूक करण्यात आली होती. आतापर्यंत ३.४५ लाख टन शेतमालाची वाहतूक १०००व्या किसान रेल्वेमध्ये (Kisan Railway) मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. (jalgaon news Run one thousand Kisan Railway in savda to delhi)

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ३ जानेवारीला सावदा (महाराष्ट्र) ते आदर्श नगर दिल्ली (Delhi) येथे जाणाऱ्या मध्य रेल्वेवरील किसान रेल्वेच्या १०००व्या फेरीला वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सावदा रेल्वे स्थानकावर आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री तोमर म्हणाले, की आपला देश कृषिप्रधान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. किसान रेलच्या माध्यमातून चांगली किंमत मिळण्यासाठी फळे आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंची वाजवी दरात दूरच्या बाजारपेठेत वाहतूक ही अशीच एक योजना आहे. रेल्वे मंत्री अश्‍वीनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधान नेहमी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवतात आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध पावले उचलतात. किसान रेल हा असाच एक उपक्रम आहे. ज्याने शेतकर्‍यांना त्यांचे कृषी उत्पादन आर्थिकदृष्ट्या आणि त्वरीत दूरच्या बाजारपेठेत पोहोचवले जाते. जीआय टॅग मिळालेल्या जळगावच्या केळीचाही त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार रक्षा खडसे यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रेल्वेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT