Banana 
महाराष्ट्र

राजभवनात पोहचली केळी अन्‌ चिप्‍स्‌

राजभवनात पोहचली केळी अन्‌ चिप्‍स्‌

संजय महाजन

रावेर : जिल्ह्यातील तांदलवाडी (ता रावेर) येथील जीआय मानांकित केळी आता परदेशापाठोपाठ राजभवनात पोचली आहे. राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना तांदलवाडी येथील युवा प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी आणि निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशांक पाटील यांनी केळीचा घड आणि केळीपासून निर्मित विविध पदार्थ भेट दिले. (jalgaon-news-raver-banana-and-banana-chips-rajbhavan)

मुंबईतील राजभवन येथे गणेश हिंगमिरे लिखित 'जी आय मानांकन' आणि 'इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी राइट्स' या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्त मेजर जनरल ड. गिरीजा शंकर मुंगली, रामभाऊ डिंबाळे, सुधाकर आव्हाड आणि अनंत ताकवले उपस्थित होते. कार्यक्रमात राज्य सरकारच्यावतीने राज्यातील १४ जी आय मानांकन प्राप्त संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी (ता. रावेर) येथील शशांक पाटील या एकमेव युवा केळी उत्पादक शेतकऱ्याचा समावेश होता.

केळी पदार्थांचे प्रदर्शन

या ठिकाणी आयोजित प्रदर्शनात श्री. पाटील यांनी बंधू सुमित पाटील यांच्यासह पिकलेली केळी, केळीचा चिवडा, चिप्स, केळीचे पापड, केळीचे पीठ आदी वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनाला ही श्री. कोशारी यांनी भेट दिली. तालुका कृषी कार्यालयाचे तंत्रज्ञ व्यवस्थापक चंद्रकांत माळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शशांक पाटील यांनी राज्यपाल महोदयांना केळीचा घड व्यासपीठावर भेट दिला

राज्‍यपालांनी केले कौतुक

राज्यपालांनी युवा शेतकऱ्यांनी शिक्षणाचा उपयोग केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे, जळगाव जिल्ह्यात होत असलेले काम कौतुकास्पद असून ते पाहण्यासाठी उत्तराखंड मधूनही शेतकऱ्यांना येथे बोलावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT