विवाह करून प्रेमी युगल पोलिस स्‍टेशनात; नातेवाईकांचा राडा

विवाह करून प्रेमी युगल पोलिस स्‍टेशनात; नातेवाईकांचा राडा
विवाह करून प्रेमी युगल पोलिस स्‍टेशनात; नातेवाईकांचा राडा

पारोळा (जळगाव) : टोळी (ता.पारोळा) व धुळे जिल्ह्यातील चितोड येथील प्रेमी पारोळा पोलीस स्टेशनला आले असता टोळी येथील अनेकांनी पोलीस स्टेशनला गर्दी करत हुल्लडबाजी करत राडा केला. यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची एरंडोल व अमळनेर येथील कुमक यांनी काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागले. यावेळी गर्दीने महामार्गावर गर्दी करत रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. (jalgaon-news-Married-couple-at-parola-police-station-relatives-crowd)

महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या पोलिस स्टेशनला तालुक्यातील टोळी येथील २२ वर्षीय तरुण व चितोड जिल्हा धुळे येथील १९ वर्षीय तरुणीनी बाहेरगावी विवाह केला होता. सदर तरुणी व तरुण हे वयात पूर्ण असून त्यांच्या संमतीने पळून जाऊन विवाह केला आहे. मंगळवारी (ता.३) सायंकाळी सातला प्रेमीयुगुल पारोळा पोलीस स्टेशनला आले. त्याचवेळी मुलीच्या नातेवाईकानीही पोलीस स्टेशन गाठत तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यावरील मुलीच्या नातेवाईकांनी देखील गाड्याच्या गाड्या भरून आणलेल्या होत्‍या.

हुल्‍लडबाजी करत राडा

परिसरात दोनशे ते तीनशे लोक जमले. याबाबत पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी त्यांची समजूत काढत असताना काहिंनी हुलकावण्या केल्या, आरोळ्या मारत, हुल्लडबाजी करून राडा करण्याचा प्रयत्न केला असता त्याचवेळी पोलिसांनी वेळीच हातात काठ्या घेऊन जमलेल्या गर्दीला पांगवले.

विवाह करून प्रेमी युगल पोलिस स्‍टेशनात; नातेवाईकांचा राडा
महिलाच चालवत होत्या घरात अवैध दारू भट्टी!लाखोंचा माल जप्त

महामार्ग झाला बंद

एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने महामार्गालगत सगळ्यांनी पळ काढला. काहीवेळ पळा पळ झाल्याने काही मिनिटांसाठी महामार्ग बंद झाला होता. त्यामुळे शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्याची गर्दी जमली होती. या प्रकरणाने एकच चर्चा रंगली होती. पारोळा पोलिसांनी परिस्थितीवर लगेच नियंत्रण आणले. दरम्यान सदर घटनेबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावंडे यांनी माहीती घेत ते पोलिस स्टेशन येथे ठान मांडुन होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com