जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व विरोधक मुंबईत एकवटले आहेत. विरोधकांनी मुंबईची हवा खावी, समुद्र पहावा (Jalgaon News) आणि पंतप्रधानपदाचा एखादा उमेदवार निश्चित करावा; असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. (Tajya Batmya)
मुंबईत आज होणाऱ्या बैठकीवर बोलताना रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात किती पक्ष वाढवायचे तेवढे विरोधकांनी वाढवावेत. रिपाइं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असणार असल्याचे ठाम मत त्यांनी यावेळी मांडले.
कितीही दंड थोपटले तरी आमचीच सत्ता
इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक यासह असंख्य कामे एनडीए सरकारने केली आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही दंड थोपटले तरी २०२४ मध्ये पुन्हा केंद्रात आमची सत्ता येऊन नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होतील असा दावाही रामदास आठवले यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.