Rainfall Saam tv
महाराष्ट्र

पाचोरा, भडगाव तालुक्यात पावसाचे थैमान; वीज कोसळून पेटले झाड

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाचोरा व भडगाव शहर व परिसरात शुक्रवारी (ता. ८) दुपारपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान (Heavy Rain) घातल्याने जनजीवन विस्कळित झाले. शहरातील सखल भागात, वसाहतीमध्ये प्रचंड पाणी साचून अनेकांना घरापर्यंत जाणे अशक्य झाले. पाचोऱ्यात राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्ग, शिवाजीनगर भागातील पूल येथे प्रचंड पाणी साचल्याने शहराशी असलेला संपर्क तुटला. सुमारे तीन तास वाहनांसह अनेकांना शहराबाहेरच थांबावे लागले. कृष्णापुरी येथील पुलाचे काम सुरू असल्याने तेथून शहरात जाता आले नाही. या पावसाच्या थैमानामुळे मातीची व पत्र्याची घरे पडली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पशुधनासही इजा पोहोचली आहे. (jalgaon news Rainfall in Pachora Bhadgaon taluka)

पाचोरा (Pachora) शहरातील गणेश कॉलनी, मिलिंदनगर, भीमनगर, जनता वसाहत, नागसेन नगर, शिवाजीनगर, हनुमाननगर ,वाल्मीकी कॉलनी या भागात पूर सद्दष्य परिस्थिती निर्माण झाली. घरात व दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांनी मदत व सहकार्याची मागणी केली आहे. आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी पोलिस व महसूल यंत्रणेकडून पाऊस व झालेल्या नुकसानीची सकाळीच माहिती घेतली व पावसाची झळ बसलेल्या शहरातील विविध भागात भेट देऊन पाहणी केली. रहिवाशांशी संवाद साधला व त्यांना मदत, सहकार्याबाबत आश्वासन देऊन मानसिक धीर दिला. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, मुकुंद बिल्दीकर, ठेकेदार मनोज पाटील, प्रवीण ब्राह्मणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सूर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे मुकादम कर्मचारी यांनी भेट देऊन या प्रभावित भागाची पाहणी केली. पाणी निचरा होण्यासाठी नाले, गटारी त्वरित बांधण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी आदेशित केले.

भडगावमध्ये मुसळधार

भडगाव (Bhadgaon) शहरासह तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) रात्री मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात खऱ्या अर्थाने मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. ग्रामीण भागात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्व हंगामी कापसाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून काही भागात पावसाची रिपरिप सुरू होती. बाबंरूड भागात मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचले होते.

वीज कोसळून पेटले झाड

एरंडोल : तालुक्यातील टोळी येथे दुपारी तीनच्या सुमारास अचानक कडुलिंबाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, वीज कोसळल्याने हिरवेगार झाडचे पेटल्याने हा थरार रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी पाहिला. एरंडोल - धरणगाव रस्त्यावरील टोळी गावाजवळ शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरवात झाली. अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला. अचानक वीज कडुलिंबाच्या झाडावर कोसळली व झाडाला आग लागली. एरंडोल - धरणगाव रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र वीज कोसळली, त्यावेळी सुदैवाने कोणतेही वाहन ये जा करत नव्हते. या मुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT