Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse Statement: मुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अधिकारींवर दबाव; एकनाथ खडसेंचा आरोप

मुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अधिकारींवर दबाव; एकनाथ खडसेंचा आरोप

संजय महाजन

जळगाव : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात शासकीय योजनांची (Jalgaon) माहिती जनतेपर्यंत जाणार असल्याचं सांगितले जात आहे. परंतु हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सत्ताधाऱ्यांकडून लाभार्थ्यांवर कार्यक्रमाला येण्यासाठी आणि शासकीय अधिकाऱ्यांवर गर्दी जमवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप (Eknath Khadse) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. (Live Marathi News)

जळगावात आज शासन आपल्‍या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात येत आहेत. या दरम्‍यान कापसाला भाव मिळावा यासाठी राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे मुख्‍यमंत्रींनी काळे झेंडे दाखविणार आहेत. याबाबत माध्‍यमांशी संवाद साधताना खडसे यांनी आरोप केला आहे.

धास्‍ती का बाळगताय

खडसे यांनी सांगितले, की जर या सरकारची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर आहे. तर लोकांनी न बोलताच कार्यक्रमाला यायला हवं होते. त्यासाठी लाभार्थ्यांवर दबाव आणण्याची गरज काय होती? असा सवालही खडसेंनी उपस्थित केला. हे सरकार इव्हेंटबाजी करत आहे. जो पैसा कार्यक्रमावर खर्च केला जात आहे. त्याऐवजी कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यायला हवं, असंही खडसे म्हणाले. आम्ही जनतेचे प्रश्न सोडवावेत म्हणून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचं काम करतोय. परंतु त्यालाही विरोध होत आहे. आम्ही फक्त काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहोत. त्याची एवढी धास्ती बाळगण्याचं कारण काय असा सवालही खडसेंनी उपस्थित केला आहे.

मनपाचे आदेश मागे घेऊ : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना या संदर्भात विचारणा केली असता ‘लाभार्थींनी सभेला यावे, अशी अपेक्षा आहे, पण कोणावरही सक्ती नाही. असे संदेश पाठवायला कुणीही सांगितले नाही. धान्य बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. जे दुकानदार अशा धमक्या देतील त्यांचे परवाने रद्द करू. महापालिका प्रशासनाने शाळांना दिलेले आदेशदेखील मागे घेण्यास सांगण्यात येईल’, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT