eknath khadse chandrashekhar bawankule
eknath khadse chandrashekhar bawankule 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने खडसेंना काय दिले; केवळ लटकवून ठेवले : चंद्रशेखर बावनकुळे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एकनाथ खडसे हे सर्वांचे आदरणीय नेते होते. माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह आम्‍ही त्‍यांचा सल्‍ला घेत होतो. परंतु, विरोधी पक्षाने संभ्रम निर्माण केला. राष्‍ट्रवादीने त्‍यांना इतक्‍या ताकदीने पक्षात घेतले त्‍याचवेळी मंत्रीपद का दिले नाही. गेल्‍या दीड वर्षांपासून नाथाभाउंना लटकवून ठेवले असून राष्‍ट्रवादीने खडसेंना काय दिले? असा सवाल माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

जळगाव जिल्‍ह्यात आले असताना बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत मुद्दे मांडताना खडसेंवर निशाणा साधला. बावनकुळे यांनी सांगितले, की कोणी पक्ष सोडला तर भाजपला काही फरक पडत नाही. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मग प्रवेश करताच त्यांना मंत्रिपद का दिले नाही? असा प्रश्‍नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

खडसेंवर कोणी अन्‍याय करेल इतकी ताकद कोणात नव्‍हती

एकनाथ खडसे हे सर्वांसाठी आदरनीय होते. अख्‍खा महाराष्‍ट्र त्‍यांना नेतृत्‍व मानत होता. सभागृहात देखील देवेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री असताना देखील त्‍यांचा सल्‍ला घेत होते. मुळात खडसेंवर कोणी अन्‍याय करेल इतकी ताकद कोणाची नव्‍हती. कारण खडसे हे सर्वांसाठीच आदरनीय राहिले आहेत.

कोणाच्‍या जाण्याने फरक पडत नाही

भाजप हा कार्यकत्‍र्यांचा पक्ष आहे. पक्षातील कितीही मोठा नेता अगदी गल्‍ली ते दिल्‍लीपर्यंतचा मोठा नेता जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडत नाही. खडसे पक्ष सोडून गेले तरी त्‍यांच्‍या जागेवर पक्षाला फरक पडत नाही. लोकसभा, विधानसभा जिंकतीलच असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्‍यक्‍त केला.

भाजपकडून अन्याय नाहीच

भाजप वाढविण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान राहिले. पक्षात त्यांचा आदर व सन्मानच होता. त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे पक्षाचे आमदार काम करत होते. खडसेंनी पक्ष सोडला हा त्यांचा निर्णय होता. भाजपने त्यांच्यावर अन्याय केला, असे म्हणणे चुकीचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal Released : मद्यधोरण घोटाळ्यात अटक, ५१ दिवस तुरुंगात, तिहारमधून सुटका

Sharad Pawar Pune | पुण्यातील शरद पवारांची सभा रद्द

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना होणार अटक?, दिल्ली कोर्टाने लैंगिक छळ प्रकरणातील आरोप केले निश्चित

Today's Marathi News Live : पहिल्यांदा निर्यातीवर 40% कर लावला, निर्यात बंद केली: जयंत पाटलांचा आरोप

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; कायम जामीन अर्ज मंजूर

SCROLL FOR NEXT