Burning Car 
महाराष्ट्र

पेटत्या कारमध्ये शिक्षकाचा जळालेला मृतदेह; घातपाताचा संशय

पेटत्या कारमध्ये शिक्षकाचा जळालेला मृतदेह; घातपाताचा संशय

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : पारोळा- भडगाव रस्त्यावरील पोपटनगर शिवारात पेटत्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत शिक्षकाचा मृतदेह संशयास्पदरीत्या गुरूवारी आढळून आला. शुभम संजय राजपूत (वय ३१) असे शिक्षकाचे नाव असून, अमळनेर येथील रहिवासी आहेत. (Jalgaon Parola News: body of a teacher burnt in a burning car)

पारोळा (Parola) - चोरवड रस्त्यावर पोपटनगर गावानजीक जळालेल्या कारमध्ये एका ३१ वर्षीय उपशिक्षकाचा जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिस पाटील यांनी पोपटनगर शिवारातील जंगलात एका कारमधून धूर निघत असल्‍याची माहिती पारोळा पोलिस (Parola Police) ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे पोलिस (Police) पथकासह घटनास्थळी पोहचले असता तेथे कारसह त्या उपशिक्षकाचा मृतदेह जाळून खाक झाल्याने ओळख पटणे अशक्य झाले होते.

फोनद्वारे नातेवाईकांची चौकशी

त्यांच्याजवळ असलेल्या फोनद्वारे नातेवाईकांकडे चौकशी केली असता हा युवक शुभम संजय राजपूत (रा. खोकरपाट, अमळनेर) येथील असून ते (एमएच १८, डब्लू ९४५६) या कारने बाहेरगावी निघाले होते. मग कारसह त्याचा जळून मृत्यू कसा झाला? किंवा त्याचा घातपात करून कार पेटवून दिली? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कार केवळ बाहेरून पेटलेली (Burning Car) असल्‍याने संशय वाढला आहे.

उरला केवळ सांगाडा

पेटत्‍या कारमधून शुभम यांना बाहेर पडता आले नाही. यामुळे त्‍यांचा कारमध्‍येच जळून कोळसा झाला. नातेवाईकांना देखील अंत्‍यसंस्‍कारासाठी केवळ सांगाडा नेता आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: पन्नाशी गाठलेली मलायका अजुनही इतकी फिट कशी?

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Winter Care: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Chandrapur News : पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप; भद्रावती येथील प्रकार, पोलिसांनी टाकली धाड

Fortune Powerful people list : फॉर्च्युनच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर, जगातील शक्तिशाली व्यक्ती कोण?

SCROLL FOR NEXT