जळगावात परदेशातून आलेल्या दोन नागरिक सापडेना

जळगावात परदेशातून आलेल्या दोन नागरिक सापडेना
Jalgoan Corona Update
Jalgoan Corona UpdateSaam TV
Published On

जळगाव : देशभरात सध्या कोरोनाच्या ओमीक्रॉन विषाणूंची बाधा अनेकांना होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विशेषतः परदेशातून जळगावला आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. या महिन्यात परदेशातून ७४ नागरिक आले आहेत. त्यापैकी २ जणांनी चूकीचा मोबाईल व पत्ता दिल्याने ते ट्रेस होत नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. (jalgaon news Two foreign nationals were now found in Jalgaon)

Jalgoan Corona Update
वर्षाच्या शेवटच्या दिवशी उस्मानाबादेत भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

चुकीचा संपर्क क्रमांक किंवा मोबाईल बंद असल्यामुळे परदेशातून आलेले दोन नागरिक अजूनही ट्रेस झालेले नाहीत. जे परदेशातून आले त्यातील काहींचा पत्ता योग्य नसल्याचीही माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या व्यक्तींशी संपर्क साधणे कठीण जात आहे. ओमीक्रॉनच्या (omicron) बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते ओळखू येत नाहीत. त्यामुळे विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाने महापालिका व स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधून कोविड (Covid 19) चाचणी करून घ्यावी.

आतापर्यंत आले ७४ नागरीक

आतापर्यंत जळगाव (Jalgaon) शहरात दाखल झालेल्या ७४ नागरिकांपैकी ७२ नागरिकांशी आरोग्य यंत्रणेचा संपर्क झाला असून, २ नागरिक अजूनही नॉट रिचेबल आहेत. यापैकी एकही नागरिक ओमायक्रॉन बाधित असल्यास तो ओमीक्रॉनचा सुपर स्प्रेडर ठरू शकतो. त्यामुळे संपर्क न झालेल्या नागरिकांनी समाजहित बाळगून स्वत:हून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप यांनी सांगितले.

सद्यस्थितीत कोरोना अपडेट

जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८२ हजार ३९७ आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. १० लाख ५९ हजार ५९९ रॅपिड ऍन्टींजेन असे १६ लाख ४१ हजार ९९६ तपासणी अहवाल पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १४ लाख ९६ हजार ५७६ अहवाल निगेटिव्ह तर १ लाख ४२हजार ८१५ अहवाल पॉझिटिव असून उपचाराअंती १ लाख ४० हजार २२७ रूग्ण बरे झाले आहेत. तर १९५९ अहवाल सारी, निदान न झालेले, परत पाठविलेले पुनर्तपासणी असे आहेत. ६४६ अहवाल प्रलंबीत आहेत. एप्रिल २०२० ते आतापर्यत २५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू नोंद झाली आहे.

नऊ नवीन रूग्णांची भर

जिल्ह्यात रोज होत असलेल्या चाचण्यांच्या माध्यमातून बोटावर मोजण्याइतपत संसर्ग रूग्ण आढळून येत असून सद्यस्थितीत गृहविलगीकरणांतर्गत जळगाव शहर ४, ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, भडगाव अशा विविध तालुक्यात प्रत्येकी १ परंतु लक्षणे नसलेल्या ९ रूग्णांवर उपचार केले जात आहेत. यात आता नवीन नऊ कोरोना पॉझिटीव्‍ह आढळून आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com