cyber crime
cyber crime 
महाराष्ट्र

ऑनलाइन साइटवर ती शोधत होती वर मुलगा; संपर्क झाला त्‍याने लग्‍नाचे गिफ्टही पाठविले पण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोशल मीडियावरील ओळखीनंतर महिला मुलींची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अमेरिकेत (America) नोकरीला असल्याचा बनाव करुन एका ठगाने पाचोरा (Pachora) येथील सॅाफ्टवेअर अभियंता तरुणीची २ लाख ५५ हजारांत फसवणूक केली आहे. सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यात वास्तव्यास असलेली तरुणी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software engineer) म्हणून काम करते. मराठी मॅट्रोमनी साइटवर ती वर शोधत होती. त्यासाठी साईटवर तिने आपला प्रोफाइल, मोबाईल नंबरसह अपलोड केला होता. त्याच क्रमांकावरून ४ नोव्हेंबरला निवांत चित्रे असे नाव सांगणाऱ्या तरुणाने तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची बोलणीही केली. आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची बतावणी त्याने केली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता. दोघेही ऑनलाईन प्रेमाच्या आणि भावी आयुष्याच्या आणाभाका घेत असतानाच त्‍याने डाव साध्य केला.

लग्नाचे गिफ्ट पाठवले

लग्नाचा निर्णय झाल्यानंतर त्या तरुणाने तिला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. त्यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किंमत एक कोटी रुपये आहे, अशा वस्तू पाठवलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावर कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही,’ असं सांगून संशयिताने ४ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५५ हजार ५०० रुपये ऑनलाईन घेतले.

पैसे गेल्यावर कळाले

अमेरिकेतील त्या भामट्याला २ लाख ५५ हजार ५०० रुपये पाठवल्यानंतर त्याने पाठवलेल्या एक कोटीच्या डॉलरसह, गिफ्टची वाट ही तरुणी बघत होती. मात्र या काळात ना पार्सल आले ना त्याच्याशी संपर्क झाला. पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

SCROLL FOR NEXT