Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : शेअर खरेदीच्या नावाने ऑनलाइन गंडा; व्यापाऱ्याची ३४ लाखांत फसवणूक

Jalgaon News : ऑनलाईन फसवणूक करण्याचे नवीन आयडिया सायबर गुन्हेगार वापरत असून त्याद्वारे फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. नागरिक देखील आमिषाला बाली पडून समोरच्यावर विश्वास ठेवत पैशांची गुंतवणूक करत असतात.

Rajesh Sonwane

जळगाव : भुसावळ येथील शांतिनगरात वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याला शेअर खरेदी विक्रीचा नाद लावून वेगवेगळ्या ट्रेडिंग व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर ॲड केले. त्याच्या माध्यमातून खेाटी माहिती देत गेल्या आठ महिन्यांत तब्बल ३४ लाख रुपयांना गंडा घातला. जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.

ऑनलाईन फसवणूक करण्याचे नवीन आयडिया सायबर गुन्हेगार वापरत असून त्याद्वारे फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. नागरिक देखील आमिषाला बाली पडून समोरच्यावर विश्वास ठेवत पैशांची गुंतवणूक करत असतात. अशाच प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला बळी पडत भुसावळमधील एका व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

भुसावळच्या शांतिनगरात फिरके हॉस्पिटलशेजारी प्रशांत मोहनलाल अग्रवाल (वय ५०) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. त्यांच्या मोबाईलवर ऐश्‍वर्या शेरे नामक तरुणीने संपर्क केला. शेअर बाजारावर नियंत्रण आणि टॉप- टेन शेअर रेटींगवर गुंतवणुकीचे आमिष दाखवून जास्तीत जास्त नफा देण्याचे आमिष तरुणीने दिले. कथित कंपनीतील ज्योती नावाच्या अकाउंटंटने वेगवेगळ्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर ॲड करून शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या बनावट लिंक शेअर करत त्याद्वारे पैसे गुंतवण्यास भाग पाडले. 

दरम्यान ऐश्वर्या आणि ज्योती यांच्या सांगण्याप्रमाणे १ एप्रिल २०२४ पासून ते आजपर्यंत प्रशांत अग्रवाल यांनी तब्बल ३४ लाख रुपये वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी ऑनलाइन अदा केले. गेल्या आठ महिन्यांत वेळोवेळी पैसे देत असताना शेअर बाजारातील स्टेट्स (ऐपत) तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. गुंतवणुकीचा लाभ तर मिळालाच नाही; उलट गुंतवणूक केलेली रक्कमही लाटल्याचे लक्षात आल्यावर अग्रवाल यांनी जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT