पाचोरा (जळगाव) : घरातून बाहेर मित्रांसोबत खेळण्यासाठी जाण्यासाठी सायकल घेत निघाला. याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने बालकाचा चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना पाचोरा शहरातील भडगाव रोड भागातील राजीव गांधी कॉलनी घडली आहे. या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाने मन हेलावणारा आक्रोश केला.
रुद्र गोसावी असे अपघातात मृत झालेल्या बालकाचे नाव असून, तो पाचोरा शहरातील पी. के. शिंदे विद्यालयात तिसरीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान १३ डिसेंबरला सायंकाळी शाळेतून घरी आला. यानंतर मित्रांसोबत खेळण्यासाठी तो बाहेर पडला. घरात आईला सांगून रुद्र हा आपली सायकल घेऊन मित्रांमध्ये खेळण्यासाठी परिसरातीलच शक्तिधाममधील बगीच्याकडे जाण्यासाठी निघाला. याचवेळी घात झाला.
घराचा बाहेर सायकल घेऊन निघताच समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरला पाहून तो प्रचंड भांबावला व सायकल घसरल्याने तो खाली पडला. याच वेळी भरधाव ट्रॅक्टर त्याच्या डोक्यावरून गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घरातून काही क्षणापुर्वी बाहेर निघालेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच गोसावी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
दरम्यान रुग्णवाहिका चालक मुकेश पाटील यांनी रुद्रचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. जितेंद्र गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रॅक्टरचालक विकास थोरात (पुनगाव, ता. पाचोरा) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार पांडुरंग पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.