Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : देवीच्या दर्शनापूर्वी हातपाय धुवायला गेले; धरणात बुडून वृद्धाचा मृत्यू

Jalgaon News : देरमेश कोळी हे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : पहाटे घरून फिरण्यासाठी निघाले असता धरणाजवळ असलेल्या देवीचे दर्शन घेण्यापूर्वी धरणाच्या (Jalgaon) पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेले असता तोल जाऊन पाण्यात पडल्याने वृद्धाचा (Death) मृत्यू झाला. सदरची घटना शेळगाव येथे २० नोव्हेंबरला सकाळी उघडकिस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

शेळगाव (ता. जळगाव) येथील रमेश दामू कोळी (वय ६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. रमेश कोळी हे पत्नी व मुलासह शेळगाव येथे वास्तव्यास होते. शेतमजूरीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यान १८ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजेच्या सुमारास रमेश कोळी हे अन्नपुर्णा माता मंदीरात दर्शनासाठी गेले होते. हे मंदीर शेळगाव धरणाजवळ आहे. दर्शन घेण्यापूर्वी हातपाय धुण्यासाठी ते धरणाजवळ (Shelgaon Barraige) गेले. यात त्यांचा तोल जावून पाण्यात पडले. पाण्यातून त्यांना बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसांनी आढळला मृतदेह 

रमेश कोळी हे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान २० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता शेळगाव गावातील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सभाष कोळी हे शेळगाव धरणात पाहण्यासाठी गेले असता रमेश कोळी याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. याबाबत नशिराबाद पोलीसांनी माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT