अमळनेर (जळगाव) : अनेकदा कारवाई होऊन देखील वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे. असेच वाळू वाहतूक करणारे (Jalgaon) वाहन पकडल्याने अंगावर ट्रॅक्टर घालून तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सोबत असल्यानं देखील (Crime News) मारहाण केली. या प्रकरणी चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)
तलाठी संदीप शिंदे, योगेश पाटील, प्रकाश महाजन व मधुकर पाटील या चौघांचे पथक १९ नोव्हेंबरला सकाळी (Amalner) पातोंडा, दहिवद परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना नांद्री गावाकडून दहिवदकडे वाळूने भरलेले ट्रॅक्टर येत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी ट्रॅक्टर अडवून चालक योगेश संतोष पाटील याला पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. मात्र, चालकाने नकार देत तलाठींना शिवीगाळ करत मारायला माणसं आणतो असे सांगून पळ काढला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
थोड्या वेळाने भूषण उर्फ सोनू देवरे व चालक योगेश पाटील हे दोघे मोटरसायकलने आले. सोबत दोनजण दुसऱ्या मोटरसायकलवर आले आणि तलाठींच्या पथकाला मारहाण सुरु केली. दरम्यान संदीप शिंदे यांना खाली पाडून भूषणने चालक योगेशला अंगावर ट्रॅक्टर घालून मारून टाका, योगेशने ट्रॅक्टर चालू केले. तेवढ्यात इतर तलाठींनी संदीप शिंदे यांना बाजूला ओढून वाचवले. भूषण व इतरांनी तलाठी पथकाच्याच काठ्या हिसकावून पथकाला मारहाण सुरू केली. या मारहाणीत शिंदे यांच्या मांडीला व गुडघ्याला तसेच हाताच्या अंगठ्याला मार लागला तर प्रकाश महाजन यांना दोन्ही पायाला व डोक्याला मार लागला. तलाठी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर (Police) पोलिसात भूषण देवरे, चालक योगेश संतोष पाटील व दोन अनोळखी अशा चौघांविरुधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.