NMU Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: ‘नॅक’ मूल्यांकनात उमविची ‘अ’ श्रेणी कायम

‘नॅक’ मूल्यांकनात उमविची ‘अ’ श्रेणी कायम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत ‘अ’ श्रेणी कायम राखली असून ३.०९ अशी एकत्रित गुणांची सरासरी (सीजीपीए) विद्यापीठास (NMU) प्राप्त झाली आहे. (Jalgaon News NMU NAC)

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे गेले. २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत नॅक पिअर टीमने विद्यापीठाला (Jalgaon) प्रत्यक्ष भेट दिली होती. आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.दिलीप चंद्रा नाथ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत इतर तीन सदस्यांचा समावेश होता. विद्यापीठाने जानेवारीत राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण परिषदेकडे (नॅक) स्वयंमूल्यांकन अहवाल सादर केल्या नंतर जून २०२२ मध्ये तो नॅकद्वारे मान्य करण्यात आला. या अहवालाच्या आधारे विद्यापीठाचे ७० टक्के मूल्यमापन यापूर्वीच झाले होते तर गुणवत्ता आधारित ३० टक्के मूल्यमापनासाठी नॅक पिअर टीम प्रत्यक्ष विद्यापीठात आली होती.

२०१५ मध्‍ये प्राप्‍त झाली ‘अ’ श्रेणी

बंगळूर येथे नॅकच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी (ता.३०) झाली. बैठकीत मूल्यमापनाच्या आधारे आलेल्या मानांकनावर शिक्कामोर्तब करून नॅकच्या संकेतस्थळावर हे मानांकन जाहीर करण्यात आले आहे. २०१५ मध्ये नॅकच्या तिसऱ्या साखळीत विद्यापीठाला ३.११ सीजीपीए सह ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली होती. त्यापूर्वी २००९ मध्ये २.८८ सीजीपीए सह ‘ब’ श्रेणी, तर २००१ मध्ये पहिल्या नॅकला सामोरे जातांना चार स्टार प्राप्त झाले होते.

‘नॅक’ची निरीक्षणे

- विद्यापीठाच्या दूरदर्शी आणि गतिमान नेतृत्वाचे कौतुक

- नावीन्यपूर्ण आणि गरजेवर आधारित अभ्यासक्रम

- आनंददायी वातावरणासह प्रदूषणमुक्त परिसर

- परिक्षेत्रातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागविण्याचे सामर्थ्य

- आधुनिक प्रयोगशाळा व संगणकीय सुविधा उपलब्ध

- उत्तम भौतिक सुविधा आणि माहिती व तंत्रज्ञानाचा वापर

- गुणवत्तापूर्ण व निष्ठावान शिक्षक, अध्ययन, अध्यापन,

- परीक्षा आणि प्रशासनात संगणकाचा उत्तम वापर

- पुरेशा क्रीडा सुविधा

या केल्या सूचना

- रिक्त शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जागा भराव्यात

- कॅम्पसमध्ये अंतर्गत वाहतुकीसाठी सुविधा द्याव्यात

- परराज्य व इतर देशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक विद्याशाखेत प्रवेश परीक्षा असाव्यात.

- विद्यापीठ कॅम्पस मध्ये पदवीस्तरावरील अभ्यासक्रम वाढवावेत

- उद्योजकीय कौशल्यासाठी आंतर विद्याशाखीय रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु व्हावेत

- देशांतर्गत व देशाबाहेर शिक्षक आदान-प्रदान व्हावेत

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अधिक विस्तार व्हावा

- उच्च पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा

- केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष अधिक मजबूत करण्यात यावा

- बिगर शासकीय संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT