जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात मागील तीन- साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासकराज संपणार आहे. यात दीड वर्षांपासून प्रशासक असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रम देखील लागणार असून मात्र प्रत्यक्षात या निवडणूक ऑक्टोम्बर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र इच्छुकांच्या आतापासून तयारी सुरु होणार आहे.
जळगाव शहर महापालिकेवर मागील दीड वर्षांपासून प्रशासकराज कायम आहे. निवडणूक कधी होणार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र मनपा निवडणुका या दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचना, आरक्षण सोडत होणार
दरम्यान जळगाव महापालिका निवडणूकीची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महापौर आरक्षण सोडत, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, प्रभाग रचना तसेच मतदार याद्यांच्या प्रक्रियेलाच तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. यानंतरच निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.
सप्टेंबर २०२३ पासून प्रशासक
जळगाव महापालिकेची निवडणूक ऑगस्ट २०१८ मध्ये झाली होती. यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जळगाव महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आला. या दरम्यान कोरोनाचा काळ असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रखडल्या होत्या. यामुळे दीड वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज आहे. तर आता मार्ग मोकळा झाल्याने पुढील प्रक्रिया केव्हा जाहीर होईल याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.