मदर मिल्क बँक saam tv
महाराष्ट्र

मदर मिल्क बँक..दोन हजार बालकांसाठी ठरली जीवदान

संजय महाजन

जळगाव : अनेकदा प्रसूती दरम्यान मातांचा मृत्यू होतो. तर कधी बाळाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशा घटनांमध्ये आई नसलेल्या बाळाला दूध देण्याची समस्या नातलगांच्या पुढे येत असते. मात्र या समस्येवर जळगाव (Jalgaon) शहरातील माता अमृत मदर मिल्क बँक ही जीवनदायीनी ठरत आहे. गेल्या अडीच वर्षात मदर मिल्क बँकेच्या दुधाचा (Milk) फायदा कुपोषित बालकांसह दूध नसलेल्या आणि आई गमवलेल्‍या दोन हजार बालकांना झाला आहे. (jalgaon news Mother Milk Bank is a lifeline for two thousand children)

बदलत्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि ताणतणावमुळे अनेक माता प्रसूत झाल्या तरी बाळाला पुरेसे दूध त्यांना येत नाही. तर काही ठिकाणी दुर्धर आजारामुळे आईचे दूध बाळाला वर्ज्य करण्यात आले असते. काही ठिकाणी प्रसूती दरम्यान आईचा मृत्यू झाल्याने दुधाअभावी बाळाचे संगोपन करणे कठीण होते. या सर्व समस्यांचा विचार करून गेल्या अडीच वर्षांच्या पूर्वी रोटरी क्लब वेस्ट आणि शाहू महाराज हॉस्पिटलचे संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली माता अमृत मदर मिल्क बँक अशा बाळांसाठी खऱ्या अर्थाने अमृत बँक ठरली आहे.

मदर मिल्क बँक

असा केला जातो उपयोग

रोटरी क्लब आणि शाहू महाराज हॉस्पिटल (Hospital) यांच्‍या विद्यमाने जळगाव शहरात माता अमृत मदर मिल्क बँक चालविली जात आहे. या उपक्रमात प्रसूती दरम्यान बाळ गमावलेल्या मातांसह आपल्या बाळाला पाजून जास्तीचे दूध असणाऱ्या आईचे दूध संकलित केले जाते. या दुधाचा उपयोग प्रसूतीनंतर दूध नसलेल्या माता, जन्मतः कुपोषित बालक (Malnourished child) आणि माता गमावलेल्या बालकांना ते देण्यात येत असते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहरात एकमेव असलेल्या या उपक्रमामुळे हजारो बालकांना जीवदान मिळाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

आईचे दुध सहा महिने जसेच्‍या तसे

कोणत्याही मातेचे संकलित केलेले दूध हे पाशचरी करण करून सहा महिने जसेच्या तसे टिकून राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असल्याने कोणत्याही बाळाला दुधा अभावी उपाशी राहण्याची वेळ येत नाही. माता अमृत मदर मिल्क बँकेच्या माध्यमातून ज्या कुपोषित बालकांना किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या बालकांना या दुधाचा वापर केल्यानंतर त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारची वाढ झाल्याचे दिसून आल्याने अनेकांच्या कल आता या ठिकाणी दुघ घेण्याकडे आणि देण्याकडे आहे.

मदर मिल्क बँक

माता अमृत मदर मिल्क बँकेच्या उपक्रमात अनेक माता स्वतः हून आपले दूध दान करण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक वेळा प्रसूतीनंतर अनेक मातांना आपल्या बाळाची दुधाची गरज भागवल्यानंतर ही जास्तीचे दूध असल्याचे जाणवत असते अशा प्रकारचे जास्तीचे दूध देखील अनेक मातांची समस्या असते अनेक वेळा ते कृत्रिमरित्या काढून फेकले जात असते. मात्र आता हेच दूध दान करण्यासाठी मोठ्या आनंदाने अनेक माता या मदर मिल्क बँकेत येऊ लागल्या आहेत.

– संगीता पाटील, अध्यक्ष, माता अमृत मदर मिल्क बँक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT