Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

खडसेंच्‍या विजयासाठी जळगावात महादेवाला दुग्‍धाभिषेक, पायी वारी

संजय महाजन

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विधान परिषदेवर विजय व्हावा व त्यांचे लवकरात लवकर मंत्री मंडळात पुनरागमन व्हावे; यासाठी (NCP) राष्ट्रवादी युवा किसानतर्फे महादेवाला दुग्ध अभिषेक करत साखडे घालण्यात आले. (jalgaon news Milk anointing to lord shiva in Jalgaon for eknath Khadse victory)

माजी मत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्‍यावर मागील तीन– साडेतीन वर्षांपासून जो अन्याय होत आहे. त्यावर वाचा फोडण्यासाठी या संकल्प पूर्तीची अभिषेक करण्यात आला. शिवाय विधान परिषदेसाठी आज मतदान (Maharashtra vidhan parishad election 2022) होत असून यात एकनाथ खडसे यांचा विजय होवून त्‍यांना लवकरात लवकर मंत्रीमंडळात स्‍थान मिळावे. तसेच त्यांच्यावर असलेल्या ईडीसह इतर चौकशींचे आरोप हे लवकरात लवकर नष्ट व्हावे; यासाठी महादेवाला साखडे घालण्यात आले. यावेळी राष्‍ट्रवादी युवा किसानचे जिल्हाध्य्ष सुरज नारखेडे, ललित नारखेडे, सिद्धार्थ सपकाळे, उमाकांत पाटील, चेतन इंगळे, मंगेश भोले, पंकज व्यास, राकेश चौधरी, आकाश रत्नपारखी यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बोदवड ते शिरसाळा पायदळ वारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनाथ खडसे यांचे (Bodwad) बोदवड तालुक्यातील असंख्य खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी बोदवड ते शिरसाळा मारूती मंदिर पायदळ वारी करून हनुमानाला साकडे घातले. मंदिरात महाआरती करून हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करत भरपूर मतांनी निवडून येऊ दे व मंत्री पद मिळू दे अशी शिरसाळा मारूतीच्या चरणी प्रार्थना केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT