नंदुरबार : नर्मदाकाठ नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचा टोक समजला जातो. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरा करीत असतांना अद्यापपर्यंत परिसरात पुरेशा प्रमाणात दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मुलांमध्ये (Nandurbar News) शिक्षणाची आवड असून सुद्धा त्यांच्या हक्काच्या शैक्षणिक अधिकारापासून वंचित राहावे लागत होते. वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरच्या मुलांची शैक्षणिक परवड आता थांबली असून, (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या ४ शाळांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. (nandurbar news Administrative approval for four Zilla Parishad schools in akkalkuwa taluka)
अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवा केंद्रात ४ शाळांना मंजुरी देण्यात आल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिपानपाडा येथे रोहिदास सरदार पावरा, दुडापाडा येथे कांतीलाल अग्रेशा पावरा, पिपलापाडा येथे परमानंद सारख्या कोकणी, उंबरपाड येथे अमोल मनोहर ठीगले यांची तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली असून यांना दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली आहे.
जि.प.सदस्याचा पाठपुरावा
जिल्हा परिषद भांग्रापाणी गटाच्या सदस्या बाजूबाई किरसिंग वसावे यांनी सर्वसाधारण सभेत नर्मदा काठावरील दुर्गम भागात शाळा सुरू करण्याच्या प्रश्न वेळोवेळी उपस्थित करून अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजित नाईक यांना निवेदन दिली. माजी सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भेटीगाठी घेत समस्या मांडल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाच्या लाभ देण्यात येईल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन देत उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शिक्षण विभागाने नुकतीच ४ शाळांना प्रशासकीय मान्यता दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.