Mangrul dam 
महाराष्ट्र

मंगरूळ धरण ‘ओव्हर फ्लो’; बारा गावांच्या जलपातळीत वाढ

मंगरूळ धरण ‘ओव्हर फ्लो’; बारा गावांच्या जलपातळीत वाढ

संजय महाजन

जळगाव : सातपुड्याच्या कुशीतील भोकरी नदीवरील मंगरूळ लघुसिंचन प्रकल्प पावसाने भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून नदीपात्रात येत असून, परिसरातील नदीपात्र खळाळून वाहत आहे. यंदाच्या पावसाळ्यात ओसंडून वाहणारा हा जिल्ह्यातील पहिलाच मध्यम सिंचन प्रकल्प आहे. (jalgaon-news-Mangrul-Dam-overflow-Increase-in-water-level-of-twelve-villages)

भोकरी नदीच्या किनाऱ्यावर आणि परिसरात असलेल्या तालुक्‍यातील सुमारे बारा- तेरा गावांच्या भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प ९९ टक्के भरला होता. सातपुड्याच्या पट्ट्यात आणि मध्य प्रदेशातील या नदीच्या उगमस्थळी पाऊस झाल्याने हा प्रकल्प आता १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागला आहे.

गावांना फायदा

मंगरूळ लघुसिंचन प्रकल्पात एकूण ६.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प आणखी काही काळ असाच भरून वाहिला तर पंधरा दिवसांत त्याचे पाणी मुखापर्यंत पोहचेल. यामुळे मंगरुळ, पिंप्री, केऱ्हाळा बुद्रुक, केऱ्हाळा खुर्द, भोकरी, अहिरवाडी, कर्जोद, तामसवाडी, वाघोड, पुनखेडा, बोरखेडा, पातोंडी आदी गावांना त्याचा फायदा होणार आहे. या गावांतील भूगर्भातील पातळी वाढून तेथील विहिरी कूपनलिकांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT