Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

Jalgaon News : तलावाच्या खोल पाण्यात पाडल्यानंतर काझी अब्दुल यांना बाहेर निघता आले नाही. तसेच त्यांच्या जवळ कोणी नसल्याने त्यांना मदत देखील मिळाली नाही. यामुळे ते पाण्यात बुडाले.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरालगत असलेल्या मेहरूण तलावात काहीजण मासेमारी करण्यासाठी जात असतात. त्यानुसार मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

जळगाव शहरातील मेहरूण परिसरामधील फातिमा मशिदीजवळ वास्तव्यास असलेले काझी अब्दुल वाहीद रईस अहमद (वय ४५) असे मृत प्रौढाचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी असा परिवार आहे. काझी अब्दुल हे मशिदीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान ३० सप्टेंबरला दुपारी ते जवळच असलेल्या मेहरूण तलावात मासेमारी करण्यास गेले होते. मासेमारी करत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन पाण्यात पडले. 

बाहेर निघता न आल्याने बुडून मृत्यू 

तलावाच्या खोल पाण्यात पाडल्यानंतर काझी अब्दुल यांना बाहेर निघता आले नाही. तसेच त्यांच्या जवळ कोणी नसल्याने त्यांना मदत देखील मिळाली नाही. यामुळे ते पाण्यात बुडाले. दरम्यान अब्दुल हे सायंकाळ होऊन देखील घरी आले नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले होते. यामुळे त्यांचा परिवाराने त्यांचा तलाव व आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र ते आढळून आले नाही. 

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह 

दरम्यान, बुधवारी सायंकाळी तलाव परिसरात असलेल्या काहींना त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह पाठविला. रुग्णालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

Winter Yoga Time: हिवाळ्यात योगा करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

Wednesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

या दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला|VIDEO

Guhagar Beach : 'गुहागर' बीचला गेल्यावर काय काय पाहावे? येथे आहे निसर्ग सौंदर्याचा खजिना

SCROLL FOR NEXT