child death saam tv
महाराष्ट्र

पतंग उडविण्याचा आनंद क्षणात विरला; चिमुकल्‍याचा मृत्‍यू

पतंग उडविण्याचा आनंद क्षणात विरला; चिमुकल्‍याचा मृत्‍यू

Rajesh Sonwane

जळगाव : मकरसंक्रांतनिमित्‍ताने पतंगोत्‍सवाचा आनंद बालगोपाल घेत असतात. सकाळपासून मोकळ्या मैदानात पतंग उडवित असल्‍याचा आनंद क्षणात विरला. दहा वर्षीय मुलाच्‍या मृत्‍यूने कुटूंबावरच दुःखाची संक्रांत ओढवली. (jalgaon news makar sankranti enjoy of flying a kite tuch electric pol current and boy death)

जळगाव (Jalgaon) शहरापासून जवळ असलेल्‍या कुसुंबा गावात सदर घटना घडली. पतंग उडवत असताना दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारेला (Electric Current) धक्‍का लागल्यामुळे मृत्यू झाला. सदरची दुर्दैवी घटना आज दुपारी बाराच्‍या सुमारास घडली. यामुळे गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तारांमध्‍ये पतंग अडकला अन्‌

हितेश ओंकार पाटील (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. हितेश मित्रांसोबत मोकळ्या मैदानात पतंग उडवायला गेला होता. पतंग (Kite) उडवीत असताना विजेच्या तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला. हा प्रकार घडल्‍यानंतर ग्रामस्थांनी त्यास तात्‍काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Jalgaon Medical Collage) व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT