चाळीसगाव (जळगाव) : येथील तहसील कार्यालयाकडे वीज बिलाची थकबाकीचा आकडा वाढल्याने आज वीज कंपनीने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे तहसील कार्यालयात इनव्हर्टरवर कामकाज सुरु होते. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात वीज कंपनीला कळविले असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल, असे तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगितले. (jalgaon-news-mahavitaran-Electricity-bill-cut-due-to-chalisgaon-tehsil-office)
विद्युत बिलाचा वापर केल्यानंतर त्याची बिलाची रक्कम थकविणारे अनेक ग्राहक आहे. यामुळे थकबाकीची रक्कम कोट्यावधीत गेली आहे. विज बिल थकविण्यात शासकिय कार्यालय देखील मागे राहिलेले नाही. शासकिय कार्यालयांकडे देखील थकित बिलाची रक्कम मोठी आहे. अशा शासकिय कार्यालयांचे कनेक्शन कापण्याचे काम देखील महावितरण करत आहे.
लॉकडाउनपासून बिल थकित
चाळीसगाव तहसील कार्यालयाने लॉकडाऊनच्या काळापासून महावितरणकडे वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आजपावेतो तब्बल २ लाख २२ हजार ४५० रुपयांचे वीज बिल थकले आहे. वीज बिल भरण्यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा केला नसल्याने आज महावितरणकडून तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.
जिल्हाधिकारींचे आदेश तरीही..
वीज पुरवठा खंडीत करु नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी पत्रव्यवहार केलेला होता. तरीही महावितरणने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केला. या संदर्भात तहसीलदार अमोल मोरे यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासकीय अनुदानाची मागणी केली असून ते लवकरच प्राप्त होईल. खंडीत वीज पुरवठा सुरु करण्यासंदर्भात वीज कंपनीच्या संबंधित अधिकार्यांशी बोलणे झाले असून वीज पुरवठा आजच ते सुरळीत करतील, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.