जि.प. अध्‍यक्षांना हवे बदलीचे अधिकार; असोसिएशनच्‍या बैठकीत चर्चा

जि.प. अध्‍यक्षांना हवे बदलीचे अधिकार; असोसिएशनच्‍या बैठकीत चर्चा
जि.प. अध्‍यक्षांना हवे बदलीचे अधिकार; असोसिएशनच्‍या बैठकीत चर्चा
Published On

जळगाव : आमदार हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांचा सदस्य असल्यास तो विकास कामांना गती देण्यास पुढाकार घेवू शकतो. यामुळे आमदार या संस्थांच्या सदस्यांमधूनच निवडण्यात यावा; याबाबतची चर्चा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्‍या जिल्‍हा बैठकीत करण्यात आली. (jalgaon-news-Z.p-The-president-wants-the-right-to-change-Discussion-in-the-meeting-of-the-association)

जिल्‍हा परिषदेच्‍या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय आढावा बैठक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे– पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रदेश कार्याध्यक्ष तथा जि. प. रत्नागिरी उपाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक संजू वाडे, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष तथा जि. प. सदस्य डॉ. नीलम पाटील, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे आदी उपस्थित होते.

एक वर्षाचा कालावधी वाढावा

सदर बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात येथून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच कोरोनाच्‍या काळात विकास कामे करू शकले नसल्याने जि. प. सदस्यांचा कार्यकाळ १ वर्षासाठी वाढविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तर जिल्हा परिषद अध्यक्षांना साधे बदलीचे अधिकार नाहीत; त्यांना असे अधिकार देवून त्यांना सक्षम बनवावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद अध्यक्ष असावेत असे ही यावेळी ठरविण्यात आले.

जि.प. अध्‍यक्षांना हवे बदलीचे अधिकार; असोसिएशनच्‍या बैठकीत चर्चा
पारोळ्यात दरेकरांच्या जोडे मार; राष्‍ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून निषेध

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती

जळगाव जिल्हाध्यक्ष पदी– प्रभाकर सोनवणे, सल्लगार– अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष– लालचंद पाटील, रावसाहेब पाटील, नंदकिशोर महाजन, अरुणा पाटील, शशिकांत साळुंखे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस– नानाभाऊ महाजन व मधुकर काटे, चिटणीस– सुरेखा पाटील, माहिती प्रचार व प्रसार– हिंमत पाटील, संघटक– रेखा राजपूत, पवन सोनवणे, जयपाल बोदडे, महिला जिल्हाध्यक्ष– जयश्री पाटील, उपाध्यक्ष– पल्लवी सावकारे, किर्ती चित्ते, सविता भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com