Kalyani patil 
महाराष्ट्र

तीची अवकाश भरारी..चौथीतील भाषणाने वाट निश्‍चित अन्‌ अमेरिका एअरलाईन्समध्‍ये पायलट

तीची अवकाश भरारी..चौथीतील भाषणाने वाट निश्‍चित अन्‌ अमेरिका एअरलाईन्समध्‍ये पायलट

Rajesh Sonwane

जळगाव : करीअरची खरी सुरवात तशी दहावीनंतर सुरू होते. दहावीनंतरच आपण काय करावे हे ठरविले जाते. परंतु, ते स्‍वप्‍न पुर्ण करणे सगळ्यांनाच जमेल असे होत नाही. पण अगदी चौथीत असताना केवळ भाषणासाठी मिळालेला विषय अन्‌ आता पुढे आपणही एअरफोर्सला जायचे; हे मनाशी ठरविले. अर्थात वयाच्‍या नवव्‍या वर्षी आकाशात झेपावण्याचे पाहिलेले स्‍वप्‍न साकार करण्याचे काम कल्‍याणी पाटील हिने यशस्‍वी केले. (jalgaon-news-kalyani-patil-success-join-america-airline-company)

मोंढाळे प्रिंपी (ता. पारोळा) येथील मुळ रहिवासी कैलास पाटील व मोहिनी पाटील यांची कन्या कल्याणी पाटील हिची ही यशस्‍वी वाटचाल. कल्‍याणी हिने नुकताच अमेरिकेत पायलट प्रशिक्षण पूर्ण केले असून, १ सप्‍टेंबरला अमेरिकेतील एअरलाईनमध्‍ये जॉईन होत आहे.

चौथीतील भाषणाने वाट निश्‍चित

कल्‍याणी पाटील ही प्राथमिक शिक्षणासाठी जळगावातील नंदीनीबाई मुलींचे विद्यालयात होती. चौथीत असताना तिला शाळेत ‘मी पायलट झाले तर..’ हा विषय भाषणासाठी देण्यात आला होता. भाषण चांगले होण्यासाठी तीने वडीलांच्‍या मदतीने अभ्‍यास करत पुर्ण माहिती मिळविली. यातून तिला अवकाशातून जाणाऱ्या विमानातून जायचे म्‍हणून आपण पायलट व्‍हायचे हे कल्‍याणीने मनाशी ठरविले.

एअरफोर्समधी संधी हुकली..

कल्‍याणीने पदवीचे शिक्षण सुरू असतानाच एअरफोर्समध्‍ये जाण्याचे ठरविले होते. त्‍या दृष्‍टीने तिने एअर एनसीसीला जॉईन झाली होती. परंतु, एअरफोर्समध्‍ये उंचीची अट होती. यात कल्‍याणी पात्र ठरू शकत नसल्‍याने तिथे जाण्याची संधी हुकली होती. यानंतर पायलट होण्याचे ठरविले. या अनुषंगाने पदवीचे शिक्षण झाल्‍यानंतर अमेरिकेत प्रायव्‍हेट पायलट या कोर्ससाठी गेली. यात सहा महिने इन्‍स्‍टुमेंट ट्रेनिंग व सहा महिने कमर्शिअल पायलट असा साधारण २५० तासांचा कोर्स नुकताच पुर्ण केला. आता तिला अमेरिकेतील एअरलाईनकडून जॉईनिंग लेटर दिले असून, १ सप्‍टेंबरला ती जॉईन होईल. येथे १५ दिवसांच्‍या ट्रेनिंग दिले जाणार आहे.

मराठी मीडियम म्‍हणून नाकारला व्‍हीसा

अमेरिकेत पायलटच्‍या प्रायव्‍हेट कोर्ससाठी जायचे असल्‍याने कल्‍याणीने फेब्रुवारी २०१७ मध्‍ये अमेरिकन ॲसेम्ब्लीत व्‍हीसासाठी अर्ज केला. परंतु, मराठी मिडीयम असल्‍याने कोर्ससाठी येता येणार नसल्‍याने ॲसेम्‍बलीने अर्ज नाकारला होता. मात्र कल्‍याणीने ‘आयईएलटीएच’च्‍या दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन ऑगस्‍टमध्‍ये व्‍हीसासाठी पुन्‍हा अर्ज केल्‍यानंतर त्‍यास मंजुरी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT