JDCC Bank 
महाराष्ट्र

JDCC Bank Election : तीन उमेदवार बिनविरोध; भाजपला धक्‍का

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीपुर्वीच भाजपला धक्‍का सहन करावा लागला आहे. कारण राष्‍ट्रवादी व शिवसेनेचे मिळून तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. (jalgaon-news-jdcc-bank-elections-Three-candidates-unopposed)

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. जिल्‍हा बँक आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीने सर्व जागांवर तयारी करण्याच्या भाजपच्या दाव्याला धक्का देण्याचे काम केले आहे.

अशी झाली बिनविरोध

दुपारी तीन वाजेपर्यंत धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून फक्त संजय मुरलीधर पवार यांचाच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली. तर पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील व एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. बिनविरोध निवड निश्‍चीत झाल्यानंतर जिल्हा बँकेत आमदार चिमणराव पाटील, संजय पवार व अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT