Fire Saam tv
महाराष्ट्र

पहाटे घराची राखरांगोळी; आग लागून दागिने, कापसाची राख

पहाटे घराची राखरांगोळी; आग लागून दागिने, कापूसाची राख

संजय महाजन

जळगाव : अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. यात सोने व रोख रक्कम तसेच घरातील कापूस (Cotton) व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (jalgaon news javkheda village house fire on morning)

युनियन बँकेचे (Bank) मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घराला अचानक आग (Fire) लागल्याचे समजले. त्यांच्या घरातील लोक गावात दत्त मंदिराची महापूजा सुरू असल्याने ते दिवा लावून मंदिरात गेले होते. कदाचित दिवा पेटून आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कापसामुळे आग झपाट्याने पसरली

घरात कापूस असल्याने कापूस पेटून मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. यावेळी अमळनेर (Amalner) पालिकेचे दोन अग्निशमन बम्ब पाठवल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते. या आगीत सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने गॅस सिलिंडर सुरक्षित राहिले अन्यथा त्यांचा स्फोट होऊन अधिक नुकसान झाले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kasara Tourism : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी झाले होते सन्मानित, मनोरंजन विश्वावर शोककळा

Mental Health Tips : सतत उदास आणि निराश वाटतंय? या आजाराची आहेत ही गंभीर लक्षणे

Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

उपचारासाठी दर्ग्यात गेली, पण अत्याचाराला बळी पडली; मौलवीचा महिलेसोबत संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT