शहाद्यात बंद, तणावाचे वातावरण..पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

शहाद्यात बंद, तणावाचे वातावरण..पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
Shahada Bandha News updates, Bandha in Shahada News
Shahada Bandha News updates, Bandha in Shahada NewsSaam tv
Published On

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा शहरात राम नवमी मिरवणुकीसाठी डीजेवर बंदी आणल्यानंतर पोलीस प्रशासनाने बँड पथकाला परवानगी दिल्यानंतरही बँड जप्त केले. याप्रकरणी राम भक्तांनी नाराज होऊन रस्त्यावरच मिरवणूक थांबवून ठिय्या आंदोलन करत पोलिस (Police) प्रशासनाचा निषेध केला होता. (nandurbar news Closed in Shahada Proclamation against police administration)

Shahada Bandha News updates, Bandha in Shahada News
Posco Act: बालिकेच्या विनयभंग प्रकरणी पोलीस पाटलास अटक

पोलिस प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज शहादा (Shahada) शहर बंद ठेवण्याचे आवाहन राम भक्तांनी केले होते. बंदला नागरिक व व्यापारी प्रतिष्ठानांनी आपले व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिल्याचे सकाळच्या सत्रात चित्र आहे. भाजीपाला व्यापाऱ्यांसह इतर सर्वत्र आस्थापन आहे बंद ठेवल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. एकूणच शहादा शहरात राम नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत बँड पथकाला जप्त करत पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पडसाद आज (Nandurbar News) शहरात दिसून येत असून शहरात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांनी रस्त्यांवर उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. (Shahada Bandha News updates)

तर कारवाई करणार पोलिस प्रशासनाची भुमिका

दुसरीकडे बंद कोणी पुकारला आहे. याबाबत आम्हाला माहित नाही. परंतु सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारी आल्यास जोर जबस्तीने दुकाने बंद करायला लावणार्‍यांवर पोलिस कारवाई करेल असा इशारा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल पवार यांनी दिला आहे. शोभायात्रेत सहभागी झालेल्या दीडशेपेक्षा अधिक नागरिकांवर पोलीसांनी उशिरा रात्री गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर येत असल्याने शहादा शहरात आज तणावपूर्ण वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नियमानुसार कारवाई

१४४ (२) कलम लागू असल्याने शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी; यासाठी पोलिस प्रशासनाने ही कारवाई केली असून शोभायात्रेदरम्यान पारंपारिक वाद्य वाजविण्यास परवानगी दिली होती. मात्र राम भक्तांकडून डीजेसह विविध गोष्टींचा हट्ट धरला जात होता. प्रशासनाने मिरवणूक थांबवली नाही व थांबविण्यास सांगितले नाही. कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com